सशक्त देशासाठी नागरिक स्वस्थ पाहिजे पाहिजे-राष्ट्रपती द्रोपदी मुर्म

25 Feb 2026 16:29:30
नंदु कुळकर्णी
शेगांव 
president draupadi murmu सशक्त देशासाठी सर्वात पहिली गरज म्हणजे स्वस्थ नागरिक पाहिजेत असे राष्ट्रपती द्रोपदी मुर्म यांनी म्हटले आहे. शेगांव येथे आयोजीत आयुष्य मंत्रालय भारत सरकार व अ भा आयुर्वैद सम्मेल यांच्या वतीने संत गजानन महाराज संस्थान च्या आनंद विसावा च्या भव्य प्रागणात आयोजीत राष्ट्रीय आरोग्य शिबीराच्या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी त्या बोलत होत्या. त्या वेळी त्या पुढे म्हणाल्या कि देशातील आरोग्य विभागाचा बोजा कमी करणे व नागरिकांचे आरोग्य सुदृढ, स्वस्थ ,निरोगी ,करणे हेच आयुष्य मंत्रालयाचे ध्येय व उद्दिष्ट आहे असे राष्ट्रपती यांनी म्हटले यावेळी मंचावर राज्यपाल आचार्य देवव्रत ,आयुष्य विभागाचे केंद्रीय मंत्री प्रतापरावजी जाधव,केन्द्रिय क्रिडामंत्री रक्षा ताई खडसे ,राज्याचे कँबीनेट कामगार मंत्री आकाशदादा फुंडकर,बुलढाणा जिल्हा पालकमंत्री मकरंद पाटील आमदार डॉक्टर संजय कुटे राजेश कोटेच्या हे मंचावर उपस्थित होते.
 
 
 
 
राष्ट्रपती द्रोपदी मुर्म
 
 
 
यावेळी बोलताना राष्ट्रपती पुढे म्हणाल्या मी स्वतः जंगलाशी निगडित आयुष्य जगलेली आहे त्यामुळे मला याची संपूर्ण कल्पना आहे की जंगलातील जडीबुटी ह्या अतिशय महत्त्वाचा घटक मानवी जीवनातील आयुष्यामध्ये आहे त्यामुळे जंगल वाचवणे औषधी झाडांचे संरक्षण संगोपन करणे ही फक्त सरकारचीच जबाबदारी नसून सर्व सामान्य नागरिकांनी सुद्धा यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन ह्या जडीबुटी वाचल्या पाहिजे ज्या मानवी जीवनाला सुख शांती आरोग्य प्रधान करू शकतात तणाव मुक्त जीवन जगण्यासाठी सर्वात पहिले निरोगी आयुष्य असणे गरजेचे आहे त्यामुळे आपल्या संस्कृतीमध्ये आपल्या गृहिणी स्वयंपाक घरामध्ये आयुर्वेदाचा वापर करत होते आपले ऋषीमुनी त्यावरती संशोधन करत होते व ह्याच आयुर्वेदाच्या सहाय्याने मानवी जीवन सुखी व समृद्धी होते त्यामुळे या मेळाव्यातून सुदृढ व निरोगी नागरिक बनवण्यासाठी एक पाऊल आपण पुढे टाकून सशक्त देशाची निर्मिती करू असे आव्हान त्यांनी केले,
 
स्वस्थ शरीर आयुर्वेदामुळेच राज्यपाल आचार्य देवव्रत मानवी शरीर हे पंचतत्व चे शरीर आहे त्याचा श्वास आयुर्वेदातच आहे जल ,स्थल वायू ,अग्नी ,आकाश अशा पंचतत्वाने शरीर बनलेले आहे याला निरोगी ठेवण्यासाठी पंच तत्त्वातील गोष्टींचा वापर करून ते चांगल्या पद्धतीने निरोगी राहू शकते निरोगी राहणे हे सर्वात पहिले सुख आहे असे आचार्य देवरत यांनी म्हटले आहे आयुर्वेदामध्ये शोधन क्रिया करा जडीबुटी चा उपयोग करा आयुर्वेद सांगते की आजारी पडू नका थोडे खा स्वस्थ जास्त जगा ऋतूप्रमाणे आपल्या आहार विहारांमध्ये बदल करा या तत्त्वाप्रमाणे जर आपण राहिलो तर आपण स्वस्थ आणि निरोगी राहू शकतो त्यामुळे या सर्वांचे पालन आपण केले पाहिजे असे राज्यपाल आचार्य दैवत यांनी म्हटले जगामध्ये आयुर्वेदाचा प्रचार प्रसार करणार ना प्रतापराव जाधव जगामध्ये तत्पर निरंतर प्रेरक मार्गदर्शन म्हणून आयुर्वेदाचा प्रचार प्रसार करण्यासाठी तीन संस्थांची निर्मीती केलेली आहे या तीन संस्थेद्वारे आयुर्वेदाला जगामध्ये प्रस्थापित करायचे आहे.
 
त्यामुळे आयुष्य निरोगी होईल औषधी वनस्पतीची शेती करून शेतकऱ्यांना सक्षम व त्यांच्या उत्पन्नात वाढ करून त्यांच्या आयुष्यमान सुधारण्याचा यातून प्रयत्न होणार आहे दवाखान्यांचे काम कमी पडावे यासाठी भारत जगाला वन औषधींचे, जडिबुटि उत्पन्न वाढवून त्याद्वारे दवाखान्याचे काम कमी करण्याचे धोरण अवलंबणार आहे जीवनशैलीमध्ये सुधारणा करणे गरजेचे आहे या आरोग्य महामेळाव्या मध्ये आरोग्य तपासणी वऔषधी वितरण होणार आहे राज्यामध्ये आयुष्य मंत्रालयाची लवकरच स्थापना होणार असल्याचे त्यांनी सांगितले यामुळे राज्यातील शेतकऱ्यांची आर्थीक उन्नती होईल व सर्वसामान्य जनतेला आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी याचा मोठा फायदा होईल असे प्रतापराव जाधव यांनी म्हटले आहे स्वस्थ भारताचा संकल्प गुणवत्तापूर्ण जीवन स्वस्थ व निरोगी आरोग्य आहे.
 
असे त्यांनी म्हटले ज्यावेळेस बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार मकरंद पाटील यांनी सुद्धा मार्गदर्शन केले मान्य केंद्रीय आयुष्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी संत गजानन महाराज यांची प्रतिमा राष्ट्रपती द्रोपदी मुरमुन यांना भेट दिली तसेच राज्यपालांना संत गजानन महाराजांची मूर्ती भेट दिली राष्ट्रपती यांनी गण गण गणात बोते चा मंत्र म्हणून भाषणाला सुरुवात केली.
 
आयुष्य मंत्रालयाच्या अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलनाची चित्रफित दाखवण्यात आली तसेच आयुर्वेद मध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला यामध्ये वैद्य देवेंद्र त्रिगुणा वैद्य राकेश शर्मा वैद्य मनीषा कोठेकर डॉक्टर आशुतोष गुप्ता पी वारयम वैद्य रामदास आव्हाड या मान्यवरांना पुरस्कृत करण्यात आले व राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानपत्र बहाल करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने व कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली या महा शिबिराच्या निमित्ताने दिनांक 26 27 28 रोजी आरोग्य शिबिर तसेच शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन तसेच ए डी आय पी वयोश्री तपासणी शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन डोळे तपासणी व चष्मे वाटप घरचा वैद्य आजीचा बटवा व घरगुती आयुर्वेदिक प्रथम उपचार याचे प्रशिक्षण सुद्धा यावेळेस देण्यात येणार आहे असे विविध कार्यक्रमु होणार आहेत तसेच कार्यक्रम स्थळी आनंद विसाव्याच्या प्रांगणात विविध आयुर्वेदिक उत्पादनांचे स्टॉल विक्री व प्रदर्शनीसाठी लागलेले आहेत विक्रीसाठी लागलेले आहेत.
 
राष्ट्रपतींनी घेतले संत गजाननाचे दर्शन भारताच्या राष्ट्रपती महामंडळ श्रीमती द्रौपदी यांनी संत गजानन महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले यावेळेस संत गजानन महाराज संस्थान च्या वतीने त्यांचा भव्य स्वागत सत्कार करण्यात आला मृदुंगाच्या अभंगाच्या साथीने राष्ट्रपतींचे स्वागत करण्यात आले.president draupadi murmu आगमनाच्या वेळेस त्यांना औक्षण करण्यात आले ब्राह्मरुंदाच्या मंत्रोच्चाराने वातावरण पवित्र झाली होते टाळ मृदुंग तुतारी सनई चौघडा अशा मंगल वाद्यसह राष्ट्रपतींचे आगमन झाले व त्यांनी संत गजानन महाराजांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले
Powered By Sangraha 9.0