उपोषणकर्त्या तीन महिलांची प्रकृती बिघडली

25 Feb 2026 19:28:23
गडचिरोली, 
fraud-case-in-agarbatti-project : आपल्या मागण्यांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसलेल्या 22 महिलांपैकी 3 महिलांची प्रकृती बिधडली. त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अंगरबत्ती प्रकल्प उभारून रोजगार देण्याचे आमिष दाखवून चामोर्शी येथील नगरसेवक आशिष पिपरे व व त्याची पत्नी नगरसेविका सोनाली पिपरे यांनी फसवणूक केल्याचा आरोप करीत त्यांच्यावर कार्यवाही करून आम्हाला न्याय मिळवून द्यावा, या मागणीला घेऊन अन्यायग्रस्त महिला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले आहे. त्यातील 3 महिलांची प्रकृती खालावली असून न्याय मिळेपर्यंत उपोषण सुरुच ठेवण्याची माहिती उपोषणकर्त्या महिलांनी दिली.
 
 
 
dfg
 
 
 
विशेष म्हणजे, आशिष पिपरे आणि उपोषणकर्त्या महिलांनी एकमेकांविरोधात चौकशीची मागणी केली होती. मात्र मागील तीन वर्षापासून पोलिस प्रशासनाकडून कोणतीच ठोस कारवाई करण्यात आली नाही. प्रधानमंत्री रोजगार सृजन योजनेच्या नावावर महिलांसोबत लाखो रुपयांची फसवणूक केल्याबाबतचे प्रकरण आता जोर धरत आहे. चामोर्शीच्या महिलांनी 23 तारखेपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरु करून आशिष पिपरेवर गंभीर आरोप लावले आहेत. एकीकडे स्वत: आशिष पिपरे यांनी सर्व आरोप खंडित करत सदर प्रकरणाची सीबीआय, ईडी आणि एसआयटी मार्फत चौकशी मागणी केली आहे.
दुसर्‍याच्या चामोर्शी येथील महिलांनी
 
 
दोषी आढळल्यास कारवाईस पात्र : पिपरे
 
 
संबंधित अंगरबत्ती प्रकल्पात माझ्या कुटूंबातील माझी आई, बहिण आणि लहान भावाची पत्नी सहभागी आहेत. मी केवळ उद्योग उभारण्यासाठी माझी जमिन उपलब्ध करून दिली होती. सर्व मशिनी आजही तिथेच सुस्थितीत आहेत. या प्रकरणात आपला काहीच सबंध नसून मी दोषी आढळल्यास आपण कारवाईस पात्र असल्याचे आशिष पिपरे यांनी म्हटले आहे.
Powered By Sangraha 9.0