मुंबई
Golmaal 5 movie दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या लोकप्रिय ‘गोलमाल’ मालिकेतील पाचव्या भागाबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच ‘गोलमाल 5’च्या शूटिंगला सुरुवात झाल्याची माहिती समोर आली आहे. या चित्रपटाच्या स्टारकास्टमध्ये नव्या कलाकारांची भर पडत असल्याने चाहत्यांमध्ये मोठी चर्चा रंगली आहे.
मनोरंजन विश्वातील वृत्तांनुसार, चित्रपटाच्या पहिल्या शेड्यूलचे चित्रीकरण सुरू झाले असून बहुतेक प्रमुख कलाकार या वेळापत्रकासाठी उपस्थित होते. अभिनेता अजय देवगण लवकरच या शेड्यूलमध्ये सहभागी होणार असल्याचे समजते. चित्रपटाचे चित्रीकरण नेमके कुठे सुरू आहे, याबाबत निर्मात्यांनी अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही.दरम्यान, या चित्रपटात दक्षिण भारतीय अभिनेत्री प्रियामणी यांची एन्ट्री झाल्याची माहिती समोर आली आहे. प्रियामणीने आधीच शूटिंग सुरू केले असून तिची भूमिका अद्याप गुप्त ठेवण्यात आली आहे. पहिल्या शेड्यूलचे चित्रीकरण सुमारे एक महिना चालणार असल्याचे सांगितले जात आहे. प्रियामणीच्या सहभागामुळे चित्रपटाला वेगळे आकर्षण लाभणार असल्याचे मानले जात आहे.
यापूर्वीच अभिनेता अक्षय कुमार यांची या चित्रपटात भूमिका असणार असल्याची चर्चा रंगली होती. ते अजय देवगण आणि त्यांच्या टोळीसोबत काही खास विनोदी दृश्यांमध्ये झळकणार असल्याचे म्हटले जात आहे. याशिवाय अर्शद वारसी, तुषार कपूर, कुणाल खेमू, श्रेयस तलपदे, जॉनी लिव्हर, संजय मिश्रा, मुकेश तिवारी आणि अश्विनी काळसेकर यांसारखे दिग्गज कलाकारही पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहेत. मात्र, यावेळी करीना कपूर खान चित्रपटात दिसणार नसल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
‘गोलमाल’ मालिकेतील Golmaal 5 movie पहिला चित्रपट २००६ मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यानंतर या मालिकेने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले असून चार चित्रपटांच्या माध्यमातून ६०० कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे. आता पाचवा भाग आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि नेत्रदीपक ठरणार असल्याचे बोलले जात आहे.
‘गोलमाल ५’ २०२७ च्या सुरुवातीला प्रदर्शित होणार असून, या चित्रपटाबाबतची अधिकृत घोषणा आणि पहिला लूक कधी समोर येतो, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.