विराट हिंदू संमेलन अभय नगरात

25 Feb 2026 16:58:51
नागपूर,
Abhay Nagar अभय नगर, सेन्ट्रल रेल्वे कॉलनी, इंद्रप्रस्थ सोसायटी आणि राजर्षी नगर या वसाहतींनी मिळून मोठ्या उत्साहात विराट हिंदू सम्मेलन संपन्न झाला. शताब्दी निमित्ताने संपूर्ण देशभरात हिंदू सम्मेलन साजरे होत आहेत. ओंकार नगर भागातील ग्राऊंडवर परिसरातील काळा मारुती मंदिरापासून कलश यात्रेला उत्साहात सुरुवात झाली. कलश यात्रेची सांगता सायंकाळी कार्यक्रम स्थळी झाली. कार्यक्रमाची सुरुवात भारत माता व गोमाता पूजनाने झाली. मंचावर उद्बोधक हेमंत जांभेकर, डॉ. नंदिनी कडूस्कर, प्रभाकर शिवणकर आणि हातगावकर उपस्थित होते. तुषार नाकाडे यांनी मान्यवरांचा परिचय करून देत ग्रंथगुच्छ देऊन स्वागत केले.
 
Abhay Nagar
 
प्रथम डॉ. नंदिनी कडूस्कर यांनी सुश्राव्य किर्तन सादर करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. त्यांनी सनातन धर्म आणि रामराज्य यावर आपले विचार मांडले. हेमंत जांभेकर यांनी पंच परिवर्तना व कुटुंब प्रबोधन यावर भाष्य करून सकल हिंदू समाजाने एकरूप होऊन काम करावे, असा संदेश दिला. Abhay Nagar कोलनीतील लहान मुलांनी वंदे मातरम् गीत सादर केले. भोयर यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाला प्रकाश बापट, नागेश मानकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता चिन्मयी जोशी यांच्या पसायदानाने झाली. यानंतर उपस्थितांनी स्नेह भोजनाचा आनंद घेतला. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जोशी, माधव डोक, निराळे, टेकाडे, कुलकर्णी, शिवणीकर, विष्णू हजारे आणि इतरांनी अथक परिश्रम घेतले.
सौजन्य: मिलिंद शिंखेडे, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0