नवी दिल्ली,
isros-pslv-rocket इस्रोच्या विश्वासार्ह रॉकेट PSLVच्या सलग अपयशांमुळे सरकार आणि वैज्ञानिकांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. या अपयशांचा सखोल अभ्यास करण्यासाठी इस्रोने पहिल्यांदाच निवृत्त तज्ज्ञ शास्त्रज्ञांची स्वतंत्र समिती स्थापन केली आहे. या समितीत माजी इस्रो अध्यक्ष एस. सोमनाथ आणि माजी पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार के. विजय राघवन यांचा समावेश आहे.

PSLVच्या अपयशाचा मागील इतिहास पाहता, गेल्या ३२ वर्षांमध्ये सलग दोन प्रक्षेपणे अयशस्वी होणे हा हा पहिलाच प्रकार आहे. १८ मे २०२५ रोजी PSLV C-61 ने C-बँड सिंथेटिक अपर्चर रडार उपग्रह EOS-09 प्रक्षेपित केला, मात्र सुमारे ६ मिनिटे २० सेकंदांनी PSLV मार्गापासून भटकला. त्यानंतर १२ जानेवारी २०२६ रोजी PSLV C-62 देखील प्रक्षेपणानंतर मार्गापासून दूर गेला, ज्यामुळे DRDO चा हायपरस्पेक्ट्रल इमेजिंग उपग्रह EOS N-1 (अन्वेश) आणि इतर १५ उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत जाण्यास अयशस्वी ठरले. समिती PSLVच्या तांत्रिक अपयशाबरोबरच संघटनात्मक कारणांचीही तपासणी करेल. isros-pslv-rocket रॉकेटच्या घटकांच्या निर्मिती, खरेदी आणि असेंब्ली प्रक्रियेत कोणती त्रुटी आहे का, याचा अभ्यासही समिती करणार आहे. यामुळे भविष्यातील प्रक्षेपणांवर प्रभाव पडण्याची शक्यता तपासली जाईल आणि जबाबदार पक्ष निश्चित केला जाईल.
एस. सोमनाथ हे रॉकेट सिस्टीममध्ये तज्ज्ञ असून, त्यांनी देशातील सर्वात वजनदार रॉकेट जीएसएलव्ही मार्क-३च्या विकासाची जबाबदारी सांभाळली आहे. त्यांचा अनुभव रॉकेट स्टेज, लिक्विड इंजिन, स्ट्रक्चरल डिझाइन, स्ट्रक्चरल डायनॅमिक्स, इंटिग्रेशन डिझाइन, मेकॅनिझम डिझाइन आणि पायरोटेक्निक्सपर्यंत आहे. isros-pslv-rocket त्यांना PSLVला पुन्हा विश्वासार्ह बनवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. इस्रोच्या सूत्रांनी सांगितले की, अपयशामुळे पुढील प्रक्षेपण उशिरा होऊ शकते, परंतु भविष्यातील प्रक्षेपणांवर मोठा प्रतिकूल परिणाम झाला नाही. समितीचे अहवाल एप्रिलपूर्वी इस्रो अध्यक्षांना सादर केले जातील, ज्यामुळे भविष्यातील PSLV मोहिमांसाठी योग्य पावले उचलली जातील.