बिबट्याचा मुकाम अन् सेलूत खळबळ!

25 Feb 2026 19:57:32
सेलू,
leopard-selu : शहरातील सिंदी सहकारी खरेदी-विक्री सोसायटीच्या आवारात आज बुधवार २५ रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास बिबट्याचे दर्शन झाले. या घटनेची माहिती परिसरात वार्‍यासारखी पसरताच नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. प्रत्यक्षदर्शिंनी दिलेल्या माहितीनुसार, सोसायटीच्या मागील बाजूस असलेल्या झुडपांमध्ये हालचाल दिसून आल्याने संशय निर्माण झाला. त्यानंतर लक्षपूर्वक पाहिले असता बिबट्या असल्याचे स्पष्ट झाले. घटनेची माहिती तात्काळ वनविभागासह पोलिस प्रशासनाला देण्यात आली.
 
 
 
j
 
 
 
सेलू वनविभागाचे क्षेत्र सहाय्यक दिनेश उईके संपूर्ण ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. वनविभाग आणि पोलिसांनी संपूर्ण परिसर आपल्या बंदोबस्तात घेतला. नागरिकांनी अफवा पसरवू नये व सुरक्षित अंतर राखावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. दरम्यान, बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी पिंजरा लावण्याची प्रक्रिया सुरू असून, नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सदर घटनेमुळे काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
Powered By Sangraha 9.0