मुंबई,
maharashtra-government-employees-da राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना महागाईच्या झळा सोसण्यासाठी राज्य शासनाने मोठा दिलासा दिला आहे. राज्य सरकारने त्यांच्या महागाई भत्त्यात (DA) ३ टक्क्यांनी वाढ करण्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली असून, यामुळे महागाई भत्ता ५५ टक्क्यांवरून थेट ५८ टक्क्यांवर पोहोचला आहे.
वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी विधान परिषदेत यासंदर्भातील अधिकृत निवेदन सादर केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे सरकारी तिजोरीवर आर्थिक भार पडणार असला तरी कर्मचाऱ्यांच्या कौटुंबिक अर्थव्यवस्थेला मोठा आधार मिळणार आहे. maharashtra-government-employees-da ही दरवाढ जुलै २०२५ पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात आली असून, जुलै २०२५ ते ऑक्टोबर २०२५ या चार महिन्यांच्या थकबाकीची रक्कम कर्मचाऱ्यांना मार्च २०२६ च्या पगारात दिली जाईल. नोव्हेंबर २०२५ ते जानेवारी २०२६ या कालावधीतील थकबाकीबाबत सरकार लवकरच स्वतंत्र आदेश जारी करणार आहे.
राज्य शासनाच्या या निर्णयाचा फायदा राज्यातील सुमारे १४ लाखांहून अधिक कुटुंबांना होणार असून, यामध्ये सुमारे ५.९६ लाख कार्यरत अधिकारी व कर्मचारी तसेच ८.१२ लाख पेन्शनधारकांचा समावेश आहे. maharashtra-government-employees-da वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी कर्मचाऱ्यांच्या हितासाठी आणि आर्थिक सुरक्षिततेसाठी सरकार कटिबद्ध असल्याचे सांगितले. या निर्णयामुळे कर्मचारी संघटनांनी समाधान व्यक्त केले असून सरकारचे आभार मानले आहेत.