मुंबई
Mumbai education budget 2026-27, मुंबई महानगरपालिकेने (BMC) आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी शिक्षण विभागाचा ४,२४८.०८ कोटी रुपयांचा भरीव अर्थसंकल्प जाहीर केला आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीस चालना देण्यासाठी या अर्थसंकल्पात सायबर साक्षरता, POCSO कायद्याबाबत जनजागृती, डिजिटल वर्गखोली, ‘जादुई पिटारा’ उपक्रम तसेच शैक्षणिक सुविधा सुधारण्यासाठी विशेष निधी राखीव ठेवण्यात आला आहे.
महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री शिरवडकर यांच्याकडे हा अर्थसंकल्प सादर केला. पाच वर्षांनंतर निवडून आलेल्या प्रतिनिधींमार्फत सादर करण्यात आलेल्या या अर्थसंकल्पात विद्यार्थ्यांसाठी मोफत शालेय साहित्य, इंग्रजी भाषा प्रयोगशाळा, विज्ञान पार्क, सायबर प्रशिक्षण आणि विज्ञान प्रयोगशाळांच्या आधुनिकीकरणासाठी निधी राखीव ठेवण्यात आला आहे. प्राथमिक शाळांसाठी १५०.५७ कोटी तर माध्यमिक शाळांसाठी ३७ कोटी रुपये साहित्यसाठी ठरवले आहेत.
इयत्ता ८ वी ते १० वीतील Mumbai education budget 2026-27, विद्यार्थ्यांसाठी २७८ इंग्रजी भाषा प्रयोगशाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी ३.८७ कोटी रुपये राखीव ठेवण्यात आले आहेत. दोन शाळांमध्ये विज्ञान पार्क उभारण्यासाठी ५ कोटी रुपये देण्यात आले आहेत. ८ वी आणि ९ वीतील सुमारे २० हजार विद्यार्थ्यांसाठी सायबर प्रशिक्षण कार्यक्रम राबविला जाणार असून प्राथमिक व माध्यमिक स्तरावर प्रत्येकी ११.८० कोटी रुपये निधी राखीव आहे.शिक्षण विभागाने सुरक्षा कायदे, POCSO कायदा आणि अमली पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यावरही भर दिला आहे. गणित आणि विज्ञान सरावासाठी ‘गणित गुरुवार’ उपक्रम राबविला जाणार असून त्यासाठी १.२० लाख रुपये निधी ठेवण्यात आला आहे.पायाभूत सुविधा सुधारणेसाठीही मोठा निधी ठरवण्यात आला आहे. यावर्षी ५७ नवीन शाळा उभारल्या जातील, तर १५ प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. यासाठी ३४० कोटी रुपये राखीव ठेवण्यात आले आहेत. ५६९ शालेय इमारतींच्या देखभालीसाठी १८०.२७ कोटी रुपये देण्यात आले असून, शाळांमध्ये CCTV बसवण्यासाठी ४२ कोटी रुपये राखीव आहेत. डिजिटल शिक्षणाला चालना देण्यासाठी प्राथमिक शाळांसाठी २३.३८ कोटी तर माध्यमिक शाळांसाठी १.०८ कोटी रुपये निधी ठेवण्यात आला आहे.विद्यार्थ्यांच्या विशेष प्रोत्साहनासाठी, दहावीच्या परीक्षेत ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या मुंबईतील पहिल्या २५ विद्यार्थ्यांचा पदवीपर्यंतचा शैक्षणिक खर्च महापालिका उचलणार आहे. ग्रंथालय अद्ययावत करण्यासाठी ५ कोटी, संगीत साहित्य खरेदीसाठी ३६ कोटी, वक्तृत्व स्पर्धा आणि ‘इको वॉरियर्स’ पर्यावरण उपक्रमासाठी २.४० कोटी, दिव्यांग थेरपी साहित्याकरिता १० लाख आणि सांघिक Mumbai education budget 2026-27, खेळांसाठी सुविधा देण्यात येणार आहेत. याशिवाय तीन आर्ट एक्सलन्स सेंटर स्थापन होणार असून अंधेरी पूर्व येथे नवीन सीबीएसई शाळा सुरू होणार आहे.हा अर्थसंकल्प शहरातील शिक्षण व्यवस्थेत गुणवत्ता वृद्धी साधण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.