नागपूरच्या तरुणांची ३३०० किमी नर्मदा परिक्रमा !

25 Feb 2026 12:39:54
नागपूर,
Narmada Parikrama राष्ट्रीय एकात्मता आणि सनातन धर्माचा प्रचार-प्रसार करण्याच्या उद्देशाने नागपूरचे तीन तरुण – विवेक मेंढी, मनोज लिल्होरे आणि शौनक गाडगे – २० फेब्रुवारी रोजी कारने नर्मदा परिक्रमेकरिता रवाना झाले. ओंकारेश्वर येथून त्यांच्या ३३०० किलोमीटर परिक्रमेची सुरुवात झाली.ही परिक्रमा मध्यप्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र या तीन राज्यांतून होत असून सध्या सुमारे १७०० किलोमीटर अंतर पूर्ण झाले आहे. उर्वरित १६०० किलोमीटर पूर्ण करून ते नागपूरला परतणार आहेत. नर्मदा परिक्रमेच्या परंपरेनुसार नर्मदा मैयेला थेट पार करता येत नाही. दक्षिण तट पूर्ण केल्यानंतर विमलेश्वर येथून समुद्रमार्गे उत्तर तटावर येऊन परिक्रमा पूर्ण करावी लागते.
 
narmanda
 
परिक्रमे दरम्यान इंदोर येथे प्रवीण लोकरे, सविता लोकरे, मिलिंद पंचाक्षरी व तनु पंचाक्षरी यांनी विवेक मेंढी, मनोज लिल्होरे आणि शौनक गाडगे यांचे पुष्पहार घालून स्वागत केले.Narmada Parikrama  मिठाई देऊन शुभेच्छा दिल्या.विवेक मेंढी हे सामाजिक उपक्रमांमध्येही सक्रिय असून रामनवमी उत्सव, गजानन महाराज प्रकटदिनानिमित्त महाप्रसाद, तसेच तान्हा पोळा असे उपक्रम राबवितात. तसेच रस्त्यावरील भटक्या गायींना प्लास्टिक व कचरा खाऊ नये यासाठी वर्षभर चारा व पाणी उपलब्ध करून देण्याचे कार्यही ते करीत आहेत. या परिक्रमे नंतर ४००० किलोमीटर पायी परिक्रमा करण्याचा त्यांचा मानस आहे.
सौजन्य:विवेक मेंढी,संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0