निकिता पुनसे सहा सुवर्णपदकांंची मानकरी

25 Feb 2026 11:57:47
तभा वृत्तसेवा
नेर, 
nikita punse नेहरू महाविद्यालयाची एमए मराठीची विद्यार्थिनी निकिता किशोर पुनसे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या वाङ्मय पारंगत मराठी विषयात विद्यापीठातून पहिली मेरीट आली आहे. तिने तब्बल सहा सुवर्णपदके व रोख अशी एकूण 7 पारितोषिके पटकावली आहेत.
 
 

nikita 
 
 
सोमवार, 23 फेब्रुवारी रोजी झालेल्या विद्यापीठाच्या बेचाळीसाव्या दीक्षांत समारंभात प्रमुख अतिथी म्हणून माजी भारतीय सेना प्रमुख जनरल मनोज पांडे व कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते यांच्या हस्ते निकिता पुनसेला सन्मानित करण्यात आले. निकिताला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सुवर्णपदक, डॉ. वि. भि. उपाख्य भाऊसाहेब कोलते सुवर्णपदक, श्रीराम नामदेव शेळके सुवर्णपदक, प्राचार्य श्रीहरी गायकवाड सुवर्णपदक, साहित्यिक दिनकर वि. जोशी सुवर्णपदक, शांताबाई लोंढे सुवर्णपदक, तसेच कवीश्रेष्ठ सुरेश भट रोख पारितोषिक अशी सात पारितोषिके प्राप्त झाली.
 
नेहरू महाविद्यालयातील पदव्युतर मराठी विभागात प्रवेशित निकिताचे आईवडील मांगलादेवी येथे मजुरी करतात. तिच्यासमोर कधी जाण्यायेण्याचा प्रश्न होता तर कधी पैशाची चणचण. पण तिने धीर सोडला नाही. आईवडील दिवसरात्र मुलीच्या स्वप्नांसाठी राबत होते. त्यांचे ते स्वप्न पूर्ण झाले.nikita punse आपली मुलगी मेरीट आल्याचा वडील किशोर व आई नंदा यांना आनंद झाला. निकिताच्या यशाबद्दल नेहरू शिक्षण संस्थेचे अध्यक्ष परमानंद अग्रवाल, कार्याध्यक्ष रवी अग्रवाल, उपाध्यक्ष राजेंद्र चिरडे, सचिव मजहरखान पठाण व सर्व संचालक मंडळ यांनी अभिनंदन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उदय मांजरे, डॉ. प्रवीण बनसोड, डॉ. शांतरक्षित गावंडे, प्रा. पंकज चव्हाण यांनी दिलेले मार्गदर्शन, सर्व शिक्षक व कर्मचाèयांच्या सहकार्यामुळे हे यश प्राप्त झाले, अशी प्रतिक्रिया निकिताने दिली.
Powered By Sangraha 9.0