“आता मायदेशी परतण्याची वेळ”; शेख हसीनांनी दिल्लीतून केली मोठी घोषणा

25 Feb 2026 11:16:31
नवी दिल्ली, 
sheikh-hasina-return-home बांगलादेशच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. देशाच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी भारतातील वास्तव्यातून आपल्या कार्यकर्त्यांना दिलेल्या संदेशामुळे ढाक्यासह संपूर्ण देशात चर्चांना उधाण आले आहे. जुलै २०२४ मध्ये उसळलेल्या आंदोलनांनंतर त्यांना पद सोडावे लागले आणि त्यांनी भारतात आश्रय घेतला. तेव्हापासून बांगलादेश सरकारकडून त्यांच्या प्रत्यार्पणाची मागणी सातत्याने होत आहे.
 
sheikh-hasina-return-home
 
दिल्लीमध्ये पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक घेतल्यानंतर हसीना यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ढाक्यात झालेल्या अवामी लीगच्या कार्यकारिणी बैठकीत सहभाग घेतला. या संवादादरम्यान त्यांनी कार्यकर्त्यांना मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या सज्ज राहण्याचे आवाहन केले. “प्रत्येकाने आता त्यांच्या मायदेशी परतावे आणि लढण्यासाठी रस्त्यावर उतरावे,” असा थेट संदेश त्यांनी दिल्याचे पक्षातील सूत्रांनी सांगितले. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वातावरण आणखी तापले आहे. हसीना यांनी अलीकडील सार्वत्रिक निवडणुकांवर तीव्र टीका करत त्यांना “लोकशाहीची थट्टा” असे संबोधले. मतदान प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचा आरोप त्यांनी केला आणि निकालांना वैधता नसल्याचे म्हटले. sheikh-hasina-return-home त्यांच्या मते, मतदारांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता आणि जाहीर झालेले मतदानाचे प्रमाण कृत्रिमरीत्या वाढवले गेले.
याशिवाय, त्यांनी अंतरिम सरकारचे नेतृत्व करणारे मोहम्मद युनूस आणि राजकीय प्रभाव असलेले तारिक रहमान यांच्यावर थेट निशाणा साधला. अवामी लीगवरील निर्बंध बेकायदेशीर असल्याचा दावा करत त्यांनी सरकारच्या निर्णयांनाच आव्हान दिले. पक्षावरील बंदी उठवली नाही तर पुढील रणनीती ठरवून कठोर भूमिका घेण्याचा इशाराही त्यांनी दिला. aदरम्यान, हसीना यांच्याविरोधात न्यायालयीन कारवाई सुरू असून त्यांना कठोर शिक्षेची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशा परिस्थितीत त्यांनी परतीची भाषा केल्याने राजकीय तणाव वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. sheikh-hasina-return-home त्यांच्या या भूमिकेमुळे समर्थकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असले, तरी देशात पुन्हा मोठ्या प्रमाणावर आंदोलन किंवा अस्थिरता निर्माण होणार का, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे.
Powered By Sangraha 9.0