राष्ट्रनिर्मितीत नुवाल यांचे याेगदान महत्त्वपूर्ण

25 Feb 2026 10:15:45
नागपूर,
nuwals contribution साेलर उद्याेग समूहाच्या माध्यमातून संरक्षण दलासाठी विकसित केलेल्या तंत्रज्ञानामुळे भारताची वाटचाल आत्मनिर्भर्तेकडे सुरू झाली आहे. राष्ट्रनिर्मितीच्या याेगदानाबद्दल भारत सरकारने सत्यनारायण नूवाल यांना पद्मश्री जाहीर केली. त्यांचे कार्य सर्वांसाठी मार्गदर्शक व प्रेरक असल्याचे गाैरवाेद्गार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्व सहकार्यवाहक व अखिल भारतीय कार्यकारणी सदस्य सुरेश उफर् भय्याजी जाेशी यांनी केले. माधव नेत्रालयाच्या, वासुदेवनगर येथील सिद्धी केंद्राच्या परिसरात सन्मान साेहळ्याचे आयाेजन करण्यात आले हाेते. यावेली अध्यक्षीय मनाेगतात जाेशी बाेलत हाेते.
 

नुवाल
 
 
प्रमुख पाहुणे म्हणून माेतीलाल ओसवाल समूहाचे मुख्यप्रबंध निदेशक माेतीलाल ओसवाल, राजस्थान ाऊंडेशन मुंबईचे अध्यक्ष गणपत काेठारी, अनिश झवेरी, माधव नेत्रालय चॅरिटेबल ट्रस्टचे महासचिव डाॅ अविनाश चंद्र अग्निहाेत्री, ट्रस्टचे उपाध्यक्ष निखिल मुंडले, माधव नेत्रालयचे प्रबंध निदेशक मेजर जनरल अनिल बाम आदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित हाेते. भय्याजी जाेशी म्हणाले, परिश्रमातून उद्याेगाच्या उभारणीसाेबत देशसेवा आणि समाजसेवा या दाेन्ही क्षेत्रात नुवाल यांची सन्मानाने वाटून वाटचाल सुरू आहे. देश आणि समाजाला समाेर ठेवून आपला देश स्वावलंबी व्हावा आणि आपण स्वयंपूर्ण व्हावे या भावनेने प्रेरित हाेऊन या उद्याेग समूहाची उभारणी केली आहे.nuwals contribution समाजाला मार्गदर्शक ठरणाऱ्या विविध क्षेत्रातील असामान्य व्यक्तींचा शाेध घेऊन हा पुरस्कार दिल्या जात असल्याचे जाेशी यावेळी म्हणाले. काेठारी, ओसवाल यांनीही नूवाल यांच्या कार्याचा गाैरव करून साेलर उद्याेग समूहाच्या माध्यमातून देशाला स्वावलंबी बनविण्यात त्यांचे कार्य प्रेरणादायी असल्याचे सांगितले. प्रारंभी अविनाश अग्निहाेत्री यांनी माधव नेत्रालय व सिद्धी केंद्रार्माफत साकारण्यात येत असलेल्या प्रकल्पाची माहिती दिली. प्रारंभी पद्म पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल माधव नेत्रालयाच्या वतीने भैयाजी जाेशी यांनी सत्यनारायण नुवाल यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन गाैरव केला. कार्यक्रमाला रवींद्र भुसारी, विजय चाैथाईवाले, नाना पालकर ट्रस्टचे कृष्णाजी महाडिक आदी उपस्थित हाेते. माणपत्राचे वाचन वंदना वर्नेकर यांनी केले. --------- हा पुरस्कार ऊर्जा देणारा - नुवाल सत्काराला उत्तर देताना सत्यनारायण नुवाल म्हणाले, हा सन्मान ऊर्जा क्षेत्रातील तसेच संरक्षण क्षेत्रासाठी केलेल्या कार्याचा गाैरव आहे. माझ्या जीवनात ज्यांनी संस्कार केला त्यांना हा समर्पित आहे. देशाच्या संरक्षणासाठी जे कार्य केले जाते त्यामध्ये साेलर उद्याेग समूहाचा सहभाग असणे हा माझ्यासाठी सर्वाेच्च सन्मान आहे. राष्ट्रनिर्मितीसाठी याेगदान यापुढेही सुरूच राहणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0