पुणे जिल्ह्यातील वर्ग-२ जमिनींचा मोठा गैरवापर

25 Feb 2026 12:54:59
पुणे,
Class-2 land, पिंपरी-चिंचवडसह संपूर्ण पुणे जिल्ह्यातील वर्ग-२ जमिनींच्या वापराबाबत जिल्हा प्रशासनाने सुरू केलेल्या तपासणीत मोठ्या प्रमाणावर नियमभंग उघडकीस आला आहे. देवस्थान, वतन, आदिवासी, पुनर्वसन तसेच शासनाकडून भाडेतत्त्वावर किंवा कब्जेहक्काने दिलेल्या एकूण २,१०० जमिनींपैकी प्राथमिक तपासणीत ३५३ प्रकरणांमध्ये अटी व शर्तींचा भंग झाल्याचे निष्पन्न झाले आहे. नियमबाह्य वापर झालेल्या काही जमिनी थेट शासनाच्या ताब्यात घेतल्या आहेत, तर काही प्रकरणांवर अंतिम टप्प्यात कारवाई सुरू आहे.
 

Pune district, Class-2 land, land misuse, Pimpri-Chinchwad, government land 
जिल्हा प्रशासनाचे अधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले की, या सर्व प्रकरणांचा सविस्तर अहवाल संबंधित तहसीलदार आणि प्रांताधिकाऱ्यांनी ५ मार्चपर्यंत सादर करावा, अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित केली जाईल.
 
 
वर्ग-२ जमिनी म्हणजे काय?
जिल्ह्यातील Class-2 land, जमिनी प्रामुख्याने वर्ग-१ आणि वर्ग-२ अशा दोन प्रकारांत विभागल्या जातात. वर्ग-२ जमिनींचा समावेश देवस्थानांच्या मालकीच्या जागा, प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन, वतन जमिनी, आदिवासींना दिलेल्या जमिनी, सीलिंगअंतर्गत वाटप केलेल्या जागा तसेच शासनाकडून ठराविक अटींवर वाटप किंवा भाडेपट्ट्याने दिलेल्या जमिनी यात होतो. या जमिनी विशिष्ट सामाजिक किंवा सार्वजनिक उद्देशासाठी वापरण्यासाठी देण्यात येतात.शासनाने या जमिनींच्या विक्री, खरेदी, हस्तांतरण किंवा वापरात बदल करण्यासाठी पूर्वपरवानगी घेणे अनिवार्य केले आहे. तसेच, निर्धारित अधिमूल्य किंवा नजराणा शुल्क भरण्यानंतरच व्यवहार करता येतात. मात्र, अनेक ठिकाणी या अटींचे उल्लंघन झाल्याचे तपासात उघड झाले आहे.
 
 

तपासणीत आढळलेले गैरप्रकार
जिल्हा प्रशासनाच्या Class-2 land, तपासणीत अनेक गंभीर बाबी समोर आल्या. काही ठिकाणी परवानगी दिलेल्या उद्देशापेक्षा पूर्णपणे वेगळा वापर सुरू असल्याचे आढळले; राहण्यासाठी दिलेल्या जमिनीवर व्यावसायिक उपक्रम चालवण्यात आले होते. काही प्रकरणांमध्ये शासनाकडून मिळालेल्या जागा परस्पर भाड्याने देण्यात आल्याचे निदर्शनास आले. तर काही प्रकरणांमध्ये ठराविक कालावधीत वापर सुरू न करता जागा रिकामी ठेवण्यात आल्या होत्या.जिल्हा प्रशासनाने नागरिकांना चेतावणी दिली आहे की, नियमांचे उल्लंघन आढळल्यास कडक कारवाई केली जाईल, तसेच या जमिनींच्या व्यवस्थापनावर विशेष लक्ष ठेवले जाणार आहे.
Powered By Sangraha 9.0