दत्ता गाडेचा निर्दोष मुक्ततेसाठी अर्ज

25 Feb 2026 15:19:58
पुणे,
Datta Gade case पुण्यातील स्वारगेट बस स्थानकामध्ये झालेल्या गंभीर लैंगिक अत्याचार प्रकरणाला एक वर्ष उलटूनही न्यायालयीन प्रक्रियेत मोठा टप्पा गाठला नाही. आरोपी दत्तात्रय रामदास गाडे (वय ३७, रा. गुनाट, शिरूर) यांनी जामिन मिळवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे तर पुणे सत्र न्यायालयात निर्दोष मुक्ततेसाठी अर्ज सादर केला आहे. या अर्जांवर न्यायालयाचे निर्णय येण्याच्या प्रतीक्षेतच आरोप निश्चितीची प्रक्रिया थांबलेली आहे. परिणामी, या प्रकरणातील पीडिता अद्याप न्यायाच्या वाट पाहत आहे.
 

Pune Swargate bus depot assault, Datta Gade case, Pune rape case 2025, 
काय झालं होत?
हे प्रकरण २५ फेब्रुवारी २०२५ रोजी Datta Gade case  सकाळी पावणेसहापासून पावणेसातच्या दरम्यान पुण्यातील स्वारगेट बस डेपोमधील शिवशाही बसमध्ये घडले. आरोपी गाडे पीडित तरुणीवर दोन वेळा बलात्कार करण्याच्या घटनेत थेट आरोपी म्हणून ओळखला गेला. घटनेनंतर आरोपी तात्काळ फरार झाला आणि आपल्या गावातील शेतात लपून बसला. पुणे पोलिसांच्या तत्पर कारवाईत तो ताब्यात घेण्यात आला. त्याला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर करून १२ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली, त्यानंतर येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीमध्ये ठेवण्यात आले.पोलिस तपास पथकाचे नेतृत्व शैलेश संखे यांनी केले, ज्यांनी आरोपीविरोधात ठोस पुरावे गोळा केले. गुन्हा घडल्यानंतर अवघ्या ५२ दिवसांत ८९२ पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. तपासादरम्यान ८२ साक्षीदारांची चौकशी करण्यात आली, त्यापैकी पाच जणांचे जबाब न्यायालयात नोंदवले गेले आहेत. तसेच, १२ पंचनाम्यांमध्ये गुगल सर्च हिस्टरी, तुलनात्मक ध्वनी तीव्रता पडताळणी, ओळख परेड, सीसीटीव्ही फुटेज आणि निवेदन या महत्त्वाच्या पुराव्यांचा समावेश आहे, जे आरोपी घटनास्थळी उपस्थित असल्याचे स्पष्ट करतात.
 
 
 
स्वारगेट बस डेपोमध्ये Datta Gade case  आरोपीने गुन्हा केल्याच्या दिवशी बस स्थानकात उपस्थित असल्याचे अनेक प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी न्यायालयात नोंदवले. तसेच आरोपीच्या शर्टाचे बटण आणि केस घटनास्थळी सापडले, ज्याचा डीएनए तपासानंतर आरोपीशी जुळवून दाखवण्यात आला. आरोपीच्या मोबाइलवरून मिळालेल्या गुगल सर्च हिस्टरीत अश्लील सामग्री पाहिल्याचे पुरावे देखील आरोपीविरोधात सिद्ध झाले.आरोपी गाडेने जामिन मिळवण्यासाठी केलेले अर्ज पुणे न्यायालयाने फेटाळले आहेत. त्यामुळे त्याने उच्च न्यायालयात तसेच सत्र न्यायालयात अर्ज करून स्वतःला निर्दोष घोषित करण्याचा प्रयत्न केला आहे. आरोपीच्या या मागण्यांना पोलिस, सरकारी वकील आणि पीडितेच्या वकिलांनी विरोध केला आहे.
या प्रकरणात सरकार Datta Gade case  क्षातर्फे विशेष सरकारी वकील अजय मिसार काम पाहत आहेत, तर पीडितेच्या वतीने ॲड. श्रीया आवले बाजू मांडत आहेत. आरोपी विरोधातील आरोप निश्चित झाल्यानंतरच खटल्याची नियमित सुनावणी सुरू होऊ शकेल, त्यामुळे पीडितेची न्यायप्रक्रियेची प्रतीक्षा अजूनही सुरू आहे.पुणे शहरासह राज्यभरात या प्रकरणाने धक्कादायक प्रतिक्रिया निर्माण केल्या आहेत. सार्वजनिक ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीने अशा प्रकरणांची गंभीर दखल घेण्याची गरज अधोरेखित झाली आहे, तर आरोपीविरोधातील न्यायालयीन प्रक्रिया अजूनही सुरू असल्याने पीडितेला न्याय मिळण्याची वाट पाहावी लागत आहे.
Powered By Sangraha 9.0