रस्त्याच्या कडेला भरावा नसल्याने अपघाताचा धोका

25 Feb 2026 19:18:14
मंगरुळनाथ,
risk-of-accident : तालुयातील तर्‍हाळा-पांगरी रस्त्याचे अलीकडेच काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. मात्र रस्त्याच्या दोन्ही बाजूंना आवश्यक मुरमाचा भराव न केल्यामुळे नव्याने तयार झालेल्या रस्त्यालगत खोल दरीसारखी स्थिती निर्माण झाली असून अपघाताची शयता वाढली आहे.
 
 
 
risk-of-accident
 
 
 
काँक्रिटीकरणानंतर सुरक्षिततेच्या दृष्टीने रस्त्याच्या कडेला मुरम टाकून समतल करणे आवश्यक असते. परंतु अनेक दिवस उलटूनही हा भराव करण्यात आलेला नाही. परिणामी दोन वाहने एकमेकांना बाजू देताना वाहनचालकांना मोठा धोका पत्करावा लागत आहे. विशेषतः ट्रॅटर, ट्रक व इतर मोठ्या वाहनांच्या वाहतुकीदरम्यान अपघाताचा धोका अधिक वाढत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. या मार्गावरून शेतकरी, विद्यार्थी व ग्रामस्थांची नियमित ये-जा असते. रस्त्याच्या कडेला उंच-सखल फरक असल्याने वाहन घसरून खाली जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे वाहनधारकांसह शेतकर्‍यांनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे. संबंधित विभागाला वारंवार कळवूनही समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. काही स्थानिकांनी अधिकार्‍यांकडून कंत्राटदाराला पाठीशी घातले जात असल्याची शंका व्यक्त केली आहे. प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष घालून रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मुरमाचा भराव करून मार्ग सुरक्षित करावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
Powered By Sangraha 9.0