तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
sandeep-shinde : संत गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून नंददीप फाऊंडेशनच्या वतीने चालविल्या जाणाèया बेघर मनोरुग्ण निवारा केंद्राच्या माध्यमातून आपण दु:खी, पीडित, मानसिक आजाराने त्रस्त असलेल्या माणसांसाठी आणि समाजातील मानवतेसाठी काम करतो, अशी भावना व्यक्त करत संदीप शिंदे यांनी यवतमाळरांचे आभार मानले. संत गाडगेबाबा यांच्या जयंतीचे औचित्य साधून सोमवारी, 23 फेब्रुवारी रोजी येथील स्वातंत्र्यवीर सावरकर मैदानात संदीप शिंदे नागरी सत्कार समितीच्यावतीने आयोजित नागरी सत्कार सोहळ्याला उत्तर देताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. विजय कावलकर, प्रमुख वक्ता संतोष अरसोड आणि सत्कारमूर्ती संदीप आणि नंदिनी शिंदे उपस्थित होते.
संदीप शिंदे पुढे म्हणाले, आपण पुरस्कारांसाठी कधीच काम केले नाही. भिकारी, बेघर यांना दररोज भोजन पुरवताना यवतमाळच्या रस्त्यांवर दयनीय अवस्थेत राहणाèया बेघर मनोरुग्णांसाठी काम करण्याची इच्छा झाली आणि हे काम सुरू केले. या कामाला यवतमाळकर आणि अनेक सेवाभावी संस्थांनी मदत केली म्हणून नंददीपचे काम आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचले.
याप्रसंगी संदीप व नंदिनी शिंदे यांचा शाल, श्रीफळ, सन्मानपत्र व अहेर देवून सन्मान करण्यात आला. यावेळी संदीप शिंदे यांना ‘मानवतेचा दूत’ ही उपाधी देवून सन्मानित करण्यात आले.
या प्रसंगी बोलताना प्रमुख वक्ते संतोष अरसोड यांनी धनसंपत्तीचा वारसदार होणे सोपे असते, मात्र संतांच्या विचारांचा वारसदार होणे फार कठीण असते, असे सांगितले. संदीप शिंदे यांनी हा मार्ग निवडून समाजाला सामाजिक संवेदना जपण्याची नवी दिशा दिली. संत गाडगेबाबा यांच्या मार्गावरून संदीपची वाटचाल सुरू असल्याचे ते म्हणाले.
यावेळी अध्यक्षीय भाषणात डॉ. विजय कावलकर यांनी नंददीपच्या कार्याचा यथोचित गौरव केला. संदीपच्या कार्यातून तरुणांनी आदर्श घेवून संवेदनशीलता जपली पाहिजे, असे ते म्हणाले.
यावेळी संदीपच्या कार्यात सातत्याने योगदान देणारे निशांत सायरे, कार्तिक भेंडे, स्वप्नील सावळे, कृष्णा मुळे, अक्षय बानोरे, विकी एकोणकर, भोजराज गजबे, बबन घोडेस्वार यांचा आणि संदीपच्या कार्यात वैद्यकीय सेवा देणाèया सेवाभावी डॉक्टरांचाही सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमापूर्वी संदीप व नंदिनी शिंदे यांना पारंपरिक वाद्यांच्या संगीतात मंचावर आणण्यात आले. याप्रसंगी ज्येष्ठ कलावंत राजा भगत यांनी संत गाडगेबाबांची वेशभूषा साकारून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कार्यक्रमाच्या सुरवातीला संदीप शिंदे यांच्या कार्यावर आधारित आनंद कसंबे निर्मित आणि नितीन पखाले लिखित ‘माणुसकी जिवंत आहे’ हा माहितीपट दाखविण्यात आला. यावेळी डॉ. प्रशांत गावंडे यांनी संदीप शिंदे यांना मिळालेल्या ‘द वन रोटरी हाँगकाँग अवार्ड’बद्दल सविस्तर माहिती दिली.
प्रास्ताविक प्रा. घनश्याम दरणे यांनी व संचालन मंगेश खुणे यांनी केले. आभार प्रा. डॉ. ताराचंद कंठाळे यांनी मानले. मानपत्राचे वाचन प्रमोद बाविस्कर यांनी केले.