सिंचनाच्या सोयीअभावी तीळ पीक धोक्यात!

25 Feb 2026 19:51:29
वर्धा,
sesame-crop-in-danger : खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन आणि कापूस या नगदी पिकांचे अतोनात नुकसान झालेल्या पवनूर येथील शेतकर्‍यांनी आता उन्हाळी पिकांकडे आपला मोर्चा वळवला आहे. मात्र, सिंचनाच्या सोयीअभावी उन्हाळी तीळ धोयात येण्याची शयता असून सुकळी प्रकल्पातून कालव्याद्वारे पाणी सोडण्याची मागणी शेतकर्‍यांनी केली आहे. या संदर्भात पवनूर येथील शेतकर्‍यांनी २४ रोजी लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांना निवेदन दिले.
 
 
k
 
यावर्षी पवनूर शिवारात खरीप हंगामात सोयाबीनची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली होती. मात्र, निसर्गाच्या लहरीपणा आणि अतिवृष्टीमुळे सोयाबीन हातचे गेले. कापूस उत्पादक शेतकर्‍यांनाही मोठा फटका बसला आहे. या आर्थिक संकटातून सावरण्यासाठी शेतकर्‍यांनी उन्हाळी हंगामात तीळ पिकाची लागवड केली आहे. उन्हाळी तीळ पिकाला पाण्याची आवश्यकता आहे. मात्र, या परिसरात सिंचनाची पुरेशी सुविधा उपलब्ध नसल्याने शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे. पाटबंधारे विभागाच्या कार्यक्षेत्रात येत असलेल्या सुकळी लघु प्रकल्पातून कालव्याद्वारे पाणी पुरवण्यात आले तर हे पीक तग धरू शकेल, असे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना सिंचनासाठी तात्काळ पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
 
 
निवेदन देतेवेळी जगदीश संचारीया, श्रीनिवास पाटणकर, गजानन कोंडलकर, सतीश राणे, दिलीप कोंडलकर, गणेश कारणकर, अनंत फुसे, शुभम फूसे, आनंद गोठे, बाबा कारणकर, आकाश बाणाईत आदींची उपस्थिती होती. या संदर्भातील निवेदन जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण व जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांनाही देण्यात आले आहे.
Powered By Sangraha 9.0