तर भारताच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये शरीफ यांचा जीव गेला असता!

25 Feb 2026 10:41:17
वॉशिंग्टन,
Sharif would have died in Operation Sindoor अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानमधील तणावाबाबत मोठा दावा केला आहे. अमेरिकन काँग्रेससमोर भाषण करताना त्यांनी सांगितले की, २०२५ मध्ये दोन्ही देशांमध्ये निर्माण झालेल्या लष्करी तणावाच्या काळात त्यांनी हस्तक्षेप केला नसता तर तब्बल ३५ दशलक्ष लोकांचा मृत्यू झाला असता. त्यांच्या मते, परिस्थिती अणुसंघर्षाच्या उंबरठ्यावर पोहोचली होती आणि त्यांच्या राजनैतिक प्रयत्नांमुळे संभाव्य विनाश टळला.
 
 
india sharif and trump
 
ट्रम्प यांनी असेही म्हटले की पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी त्यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीची गंभीरता व्यक्त केली होती. त्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा करून तणाव कमी करण्याचा प्रयत्न केला आणि युद्धबंदी घडवून आणली, असे त्यांनी पुन्हा अधोरेखित केले. मात्र भारत सरकारने हा दावा स्पष्ट शब्दांत फेटाळला असून युद्धबंदी अमेरिकेच्या मध्यस्थीमुळे झाली नसल्याचे म्हटले आहे.
 
 
 
ट्रम्प यांनी आपल्या भाषणात “ऑपरेशन सिंदूर”चा उल्लेख करत सांगितले की त्या काळात पाकिस्तानने अमेरिकेकडे मदतीची विनंती केली होती. भारताकडून झालेल्या लष्करी कारवायांमुळे परिस्थिती अधिक तीव्र झाली होती आणि त्यानंतरच राजनैतिक हालचालींना वेग आला, असा त्यांचा दावा आहे. याशिवाय, ट्रम्प यांनी सांगितले की संघर्ष थांबवण्यासाठी त्यांनी दोन्ही देशांवर मोठ्या प्रमाणात आयात शुल्क लादण्याची चेतावणी दिली होती. त्यांच्या या कठोर भूमिकेमुळे दोन अण्वस्त्रधारी शेजारी राष्ट्रांमधील संभाव्य युद्ध रोखले गेले, असे त्यांनी नमूद केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे.
Powered By Sangraha 9.0