नागपूर,
Aasman Foundation आसमान फाउंडेशनतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला नवनिर्वाचित नगरसेविका मा. निधी तेलगोटे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. तसेच सुप्रसिद्ध व्यावसायिक व नाट्य अभिनेते प्रज्वल भोयर, सुप्रसिद्ध चिकित्सक डॉ. सदानंद थोते, दर्पण भोयर, संस्थेचे अध्यक्ष डॉ. रवि गि-हे आणि सचिव नरेश शेंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर मधुरा कोलारकर यांनी आपल्या ओजस्वी भाषणातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या संघटन कौशल्यावर आणि दूरदृष्टीवर प्रकाश टाकला. अध्यक्षीय भाषणात डॉ. रवि गि-हे यांनी लवकरच ग्रामीण भागात गरीब, निराधार व सर्वसामान्यांसाठी सर्व सुविधांनी युक्त वृद्धाश्रम सुरू करण्याचा संकल्प व्यक्त केला. Aasman Foundation हा प्रकल्प जनसहयोगातून उभारण्यात येणार असून, त्यातून स्थानिकांना रोजगाराच्या संधीही उपलब्ध होतील, असे त्यांनी सांगितले. या उपक्रमासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहसचिव विभा विंचुरकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. साधना थोते यांनी केले. Aasman Foundation यावेळी सुप्रसिद्ध ज्योतिषाचार्य नरेंद्र विंचुरकर, भास्कर मुलताईकर, दिनेश टेकाडे, प्रमोद हेडाऊ, सुधीर थोते, धनंजय दहासहस्र तसेच आसमान महिला क्रेडिट सोसायटीच्या अध्यक्षा मेघा गि-हे यांसह अनेक गणमान्य नागरिक व संस्थेचे सदस्य उपस्थित होते.
सौजन्य: दिनेश टेकाडे, संपर्क मित्र