संपत्तीच्या वादातून बहिण व आईची हत्या

25 Feb 2026 19:24:26
माजरी,
sister-mother-murdered : संपत्तीच्या वादातून भावाने सख्ख्या बहिणीचा तलवारीने गळा चिरून हत्या केली. तर तिला वाचविण्यासाठी आलेल्या आईवरही हल्ला करून गंभीर जखमी केले. यात आईचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास भद्रावती शहरातील झिंगुजी वॉर्ड येथे घडली. बहिण संजीवनी शंकर भोंडे (32) व आई पुष्पा शंकर भोंडे (58) असे मृतकांची नावे आहेत. या प्रकरणी आरोपी सुरज शंकर भोंडे (28) यास भद्रावती पोलिसांनी अटक केली.
मागील काही दिवसांपासून भोंडे कुटुंबात संपत्तीच्या कारणावरून सतत वाद सुरू होता.
 
 
 
sister-mother-murdered
 
अरोपी सुरज हा वडिलासोबत, तर बहिण संजीवनी ही आई पुष्पा सोबत असे वेगवेगळे राहत होते. दरम्यान, मंगळवारी भोंडे कुटुंबात मोठा वाद झाला. यावेळी संतप्त झालेल्या आरोपी सुरजने घरातील धारदार तलावारीने बहिण संजीवनी हिचा गळा चिरला. यात तिचा जागीच मृत्यू झाला. यावेळी मुलीला वाचविण्यासाठी आलेल्या आईवरही सुरजने हल्ला केला. आई स्वत:ला वाचविण्यासाठी पळत असताना सुरजने पाठलाग करून तलावरीने तिच्यावरही वार केला. आईने शेजाराच्या घरातू घुसून कशीबशी मुलाच्या तावडीतून आपली सुटका केली. मात्र गंभीररित्या जखमी झाल्याने तिला चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान आईचाही मृत्यू झाला. पती शंकर भोंडे यांनी मुलगा सुरज याला भडकावून हत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप पुष्पा यांनी जखमी अवस्थेत असताना केल्याची माहिती आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी सुरज भोंडे यास अटक केली आहे. तसेच, आरोपीच्या वडिलांना सुध्दा चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सुरू आहे.
Powered By Sangraha 9.0