वडनेर,
skoff-rating : लोक शिक्षण मंडळ हिंगणघाट द्वारा संचालित नी. मु. घटवाई विद्यालय विज्ञान/कला कनिष्ठ महाविद्यालय, वडनेर विद्यालयाने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करीत शाळा गुणवत्ता मूल्यांकन आश्वासन आराखडा अंतर्गत जाहीर करण्यात आलेल्या उत्कृष्ट शाळांच्या यादीत मानाचे स्थान पटकाविले आहे. यामध्ये राज्यातील २ लाख २ हजार ६७५ शाळांनी स्वयं मूल्यांकन पूर्ण केले. स्वयंमूल्यांकनात सर्वाधिक गुण मिळवणार्या शाळांपैकी महाराष्ट्रातील १० हजार ७१२ शाळांचे बाह्य मूल्यांकन पूर्ण करण्यात आले. बाह्य मूल्यांकनासाठी निवडण्यात आलेल्या शाळांपैकी ४२९ शाळांना अ+ श्रेणी प्राप्त झाली आहे. या मानांकित शाळांच्या यादीमध्ये वडनेर येथील नी. मु. घटवाई विद्यालय व विज्ञान/कला कनिष्ठ महाविद्यालयाचे नाव समाविष्ट आहे. यामध्ये ६ क्षेत्र व १२८ मानांकाचा समावेश आहे.

शासकीय निकषानुसार शाळेतील भौतिक सुविधा, शैक्षणिक दर्जा, प्रशासकीय पारदर्शकता आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास या आधारावरील मानांकन दिले जाते. विज्ञान प्रदर्शनी, क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, चित्रकला स्पर्धा, शिष्यवृत्ती परीक्षा, कौशल्यावर आधारित शिक्षण विविध कलागुणांना वाव देणार्या उपक्रमांमध्ये शाळेचे विद्यार्थी नेहमीच अग्रस्थानी असतात. विद्यार्थ्यांना सामाजिक जबाबदारीचे महत्त्व कळावे या दृष्टीने करुणा लब, राष्ट्रीय सेवा योजना, इको लब, प्रहरिक लबची स्थापना करण्यात आली आहे. या लबच्या माध्यमातून पालक, गावकरी, विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवून गावोगावी सामाजिक उपक्रम राबविले जातात. डिजिटल शिक्षण, प्रशस्त मैदान, सुसज्ज प्रयोगशाळा व वनस्पती उद्यान ही शाळेची मोठी उपलब्धता आहे. शाळेने सातत्याने जपलेली शिस्तबद्धता आणि नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याची ओढ यामुळेच हे साध्य झाले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण देण्याचा प्रयत्न विद्यालयाने केला आहे.
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेमध्ये विद्यालयाने उत्तुंग कामगिरी केली आहे. या स्पर्धेत हिंगणघाट तालुयात सन २०२४-२५ मध्ये प्रथम तर सत्र २०२५-२६ करिता जिल्ह्यातून निपुण सुयर शाळा पुरस्कार सुद्धा पटकावला. या यशस्वी मूल्यांकनांच्या प्रक्रियेचे नेतृत्व प्राचार्य रवींद्र गोडे यांनी केले. त्यांच्या नेतृत्वात किरण भोयर, मिलिंद कडू, मनोज तळेकर, सुमित बोबडे, दीपक चौधरी, सचिन चंदनखेडे, आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडली.