सूरसप्तकचा ‘मन मंदिरा’ मराठी गीतांचा कार्यक्रम

25 Feb 2026 18:05:27
नागपूर,
Marathi song program मराठी भाषा गौरव दिनानिमित्त सूरसप्तकतर्फे ‘मन मंदिरा’ हा मराठी गीतांचा कार्यक्रम शनिवार, दि. २८ फेब्रुवारी रोजी सायंटिफिक सभागृहात सायंकाळी ६ ते रात्री ९ या वेळेत संपन्न होणार आहे. कार्यक्रमाची संकल्पना सूरसप्तक अध्यक्ष सुचित्रा कातरकर यांची असून, निर्मिती कार्याध्यक्ष प्रा. पद्मजा सिन्हा यांच्या मार्गदर्शनाखाली केली गेली आहे. सुप्रसिद्ध निवेदिका शुभांगी रायलू यांचे कार्यक्रमात निवेदन राहणार आहे.
 
nagpur
 
कार्यक्रमात गायक कलाकार प्रा. पद्मजा सिन्हा, प्रतिक्षा पट्टलवार, अश्विनी लुले, डॉ. ऋचा येनुरकर, संगीता भगत, अर्चना उचके, लता पटेल, अनुजा जोशी, मुकुल पांडे, डॉ. अमोल कुळकर्णी, आशिष घाटे, प्रा. निसर्ग राज, विजय देशपांडे, धीरज आटे, आदित्य फडके, योगेश देशपांडे यांनी गीते सादर केली जाणार आहेत. Marathi song program त्यांना वादक कलाकार नचिकेत देव, पंकज यादव, आशिष घाटे, प्रमोद बावणे, ऋग्वेद पांडे, उल्हास चितमुलवार आणि तुषार विघ्ने यांची साथसंगत लाभणार आहे. कार्यक्रमात अरुण ओझरकर यांचे विशेष सहकार्यही लाभले आहे. नि:शुल्क असलेल्या या कार्यक्रमाला रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आनंद लुटावा, असे आयोजकांनी आवाहन केले आहे.
सौजन्य: वर्षा किडे कुळकर्णी, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0