उमरी धरणाच्या पाण्याखाली येणारी जमीन संपादीत करण्याची मागणी

25 Feb 2026 19:14:19
मानोरा,
umri-dam : तालुयातील उमरी खुर्द या गावचे शेतकरी उत्तम रामसिंग पवार याची शेती उमरी भाग एक मध्ये एक हेटर चाळीस आर असून पैकी केवळ ३५ आर शेत जमिनीचे प्रशासनाकडून संपादन करण्यात येऊन उर्वरित राहिलेली शेतजमीन धरणाच्या पाण्यामुळे बाधित होऊन तक्रारकर्त्या शेतकरी कुटुंबाला मागील चार वर्षापासून आर्थिक नुकसानीला समोर जावे लागत आहे. त्यामुळे धरणाच्या पाण्याखाली येणारी जमीन संपादीत करण्याची मागणी शेतकर्‍यांनी केली आहे. यासाठी बाधीत शेतजमीनीवर उपोषण सुरु केले आहे.
 
 
 
k;
 
 
 
शेतकर्‍याच्या ताब्यातील व धरणाच्या पाण्यामुळे पाण्याखाली गेलेली शेतजमीन संपादित करण्यात येणे संदर्भात लघुपाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता, आमदार तथा मंत्र्यांनी दिलेल्या पत्राला संबंधित विभागाने या महिन्याच्या दोन तारखेला डोंगरावरून येणार्‍या पावसामुळे शेतीचे नुकसान होत असल्याचे उफराटे उत्तर दिल्याचा आरोप नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या वतीने करण्यात आला आहे. उमरी धरणाच्या पाण्यामुळे शेतकर्‍याच्या शेतीला लागून असलेल्या नाला ओव्हर फ्लो होऊन शेती दरवर्षी जलमग्न होऊन शेतकर्‍याला उपासमारीची पाळी येत असल्यामुळे उपरोक्त प्रकाराची निष्पक्ष चौकशी होऊन तातडीने शेतकर्‍याची शेत जमीन संपादीत करण्याच्या मागणीसाठी शेतकरी धरणाच्या पाण्यामुळे पडीक झालेल्या शेतशिवारात उपोषणाला बसलेले आहे. दरवर्षी पाठपुरावा व आंदोलन,उपोषण करूनही हाती निराशा शिवाय काहीच लागत नसल्याची व्यथा उपोषणकर्ते शेतकर्‍याने जिल्हाधिकार्‍यांमार्फत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनामध्ये मांडली आहे.
Powered By Sangraha 9.0