अनिल कांबळे
नागपूर,
vandalism-of-vehicles-in-mahal : महाल परिसरात राहणाऱ्या प्रेयसीला इम्रेस करण्यासाठी तिच्या प्रियकराने साथिदारांसह महालमध्ये येऊन रस्त्यावर उभ्या वाहनांची ताेडाेड केली. प्रेयसीच्या घरासमाेर गाेंधळ घालून तिला प्रभावित करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या घटनेमुळे महालमध्ये एकच खळबळ उडून दहशत निर्माण झाली. या प्रकरणी गणेशपेठ पाेलिसांनी गुन्हा दाखल करुन सहा जणांना ताब्यात घेतले. त्यापैकी चार अल्पवयीन मुलांना बालसंरक्षणगृहात पाठविण्यात आले तर दाेन तरुणांना अटक करण्यात आली. आराेपींना न्यायालयाने तीन दिवसांची पाेलिस काेठडी सुनावली. अन्य दाेन आराेपींचा पाेलिस शाेध घेत आहेत.
सौजन्य: AI
मंगळवारी रात्री उशीरा सशस्त्र गुंडांनी भर रस्त्यावर गाेंधळ घालत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. हातात तलवारसदृश शस्त्रे घेत आराेपी रस्त्यांवरून िफरले व महालातील डझनाहून अधिक वाहने ाेडली. या प्रकरणाची माहिती मिळताच माेठ्या प्रमाणावर पाेलिस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळाजवळ पाेहाेचले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महालातील शिवाजी पुतळा चाैकाकडून राम कूलर्स चाैकाकडे जाणारा मार्ग व आतील भागांत हा प्रकार घडला. सुमारे 8 ते 10 अज्ञात तरुण हातात शस्त्रे घेऊन शिवीगाळ करत रस्त्यावरून जात हाेते. जाेहरीपुèयाकडून ते राम कूलर चाैकाकडे गेले. त्यांनी परिसरातील मार्गांवर उभ्या असलेल्या वाहनांचीदेखील ताेडफफाेड केली.
परिसरातील लाेकांनी तातडीने याची माहिती पाेलिसांना दिली. काेतवाली आणि गणेशपेठ पाेलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी पाेहाेचले. साेबतच उपायुक्त राहुल मदने हेदेखील तेथे पाेहाेचले. महालातील विविध भागात पाेलिस बंदाेबस्त तैनात करण्यात आला व आराेपींच्या शाेधाला सुरुवात केली. पाेलिसांनी पहाटेच्या सुमारास चाैघांना तरुणांना ताब्यात घेतले आणि त्यांची चाैकशी सुरू हाेती. त्यांनी उर्वरित युवकांची नावे सांगितली. पाेलिसांनी नंदनवन झाेपडपट्टीतील स्वरूप डाेंगरे (19) व ऋषभ राजेश खरे (19, वैष्णाेदेवीनगर, वाठाेडा) यांच्यासह सहा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. परिसरातील सात रहिवाशांनी वाहनाच्या नुकसानीबद्दल तक्रार दाखल केली आहे. आराेपींविरुद्ध दंगल आणि ताेडफफाेडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सीसीटीव्ही फुुटेजवरुनु फुटले बींग
पाेलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. त्यात आठ ते दहा युवकांचे चेहरे स्पष्टपणे दिसत हाेते. त्यापैकी एक युवक राम कुलर रस्त्यावरील एका इमारतीजवळ थांबला आणि एका तरुणीला इशारा करताना दिसला. तसेच एक अल्पवयीन मुलाला काही नागरिकांनी ओळखले. त्याला ताब्यात घेतल्यानंतर या ताेडाेड प्रकरणाचे बींग फुुटले. प्रेयसीला प्रभावित करण्यासाठीच प्रियकराने गाेंधळ घातल्याची माहिती समाेर आली.