दाम्पत्यावर तीन वर्षांपासून सामाजिक बहिष्कार!

26 Feb 2026 19:24:10
* आंतरजातीय विवाह केल्याचा परिणाम
* सुजाता आणि सचिन सोनटक्के यांचा आरोप

चंद्रपूर, 
21 व्या शतकातही सामाजिक बहिष्कार! पचनी पडत नाही. पण हे खरे आहे. 'inter-caste marriage' case आंतरजातीय विवाह केल्यामुळे एका दाम्पत्यावर गेल्या तीन वर्षांपासून सामाजिक बहिष्कार टाकला जात आहे. सिंदेवाही तहसीलमधील सरडपार गावातील सुजाता आणि सचिन सोनटक्के यांनी तसा आरोप होत आहे.
 
 
panchayat
 
सुजाता आणि सचिन सोनटक्के यांची ही कहाणी आहे. सुजाता अनुसूचित जमातीची, तर सचिन अनुसूचित जातीतील आहेत. सुशिक्षित असलेल्या या दोघांनी 2023 मध्ये आंतरजातीय विवाह केला. त्यांच्या प्रेमसंबंधांची माहिती 2018 पासूनच कुटुंबीय व समाजाला माहीत होती. त्यानंतर सुरुवातीला आंशिक आणि गेल्या तीन. वर्षांपासून पूर्ण बहिष्काराला त्यांना सामोरे जावे लागत असल्याचे या दाम्पत्याचे म्हणणे आहे.
 
 
सरडपार या मुख्य गावापासून थोड्या वेगळ्या कलाने वसलेली अनुसूचित जातीची 35 ते 40 घरांची वस्ती आहे. सचिनच्या नातेवाईकांसह अनेकांनी आमच्याशी संबंध तोडले. कुणी बोलत नाही. विवाह, अंत्येष्टी, तसेच समुदाय व घरगुती कार्यक्रमांत सहभागी होऊ दिले जात नाही. गावातील दुकानांतून खरेदी-विक्री करण्यास मज्जाव आहे. आस्थास्थळी भोजनही करू देत नाहीत, असे सुजाता यांनी प्रसार माध्यमांना सांगितले.
 
 
'inter-caste marriage' case  सचिन व सुजाता यांना स्थानिक अनाज विक्रेत्याने शासकीय धान्य देण्यास नकार दिला. आशा सेविकेने मुलाचे लसीकरण, औषधे व मातेसाठीचे लाभही रोखले, असा आरोप या दाम्पत्याने केला आहे. ग्रामपंचायतीकडून आवश्यक कागदपत्रे मिळत नाहीत. उलट काही जणांनी घरात घुसून झडती घेत अपमान केला व त्याची चित्रफीत व्हायरल केली, असा आरोप या त्यांनी लावला आहे. दाम्पत्याने सांगितले की, त्यांना अपमानित करून गाव सोडण्यास भाग पाडले जात आहे. स्वयंसहायता गटांकडून निषेधाज्ञा प्रमाणपत्र नाकारण्यात आल्याचे, तसेच धमक्या व छळ होत असल्याचेही त्यांनी नमूद केले. पोलिस अधीक्षक व अतिरिक्त अधीक्षक यांची भेट घेतली. सिंदेवाही पोलिसांनी उलट आमच्याकडूनच पुरावे मागितले, असा आरोप दाम्पत्याने केला.
 
कुठलाही सामाजिक बहिष्कार नाहीः किशोर कोठेवार
'inter-caste marriage' case  कुणीही या दाम्पत्यावर सामाजिक बहिष्कार घातला नाही. वेळेवर लस उपलब्ध नसल्याने आशा वर्करने दिली नव्हती. नंतर लस दिली. कुठल्याही लहानसहान गोष्टीसाठी सचिन सोनट्टक्के हे गावकर्‍यांची तक्रार करतात. घराजवळून गाडी गेली की आमच्या घराला हादरे बसतात म्हणून तक्रार, तर शेजारी बांधकाम सुरू असेल तर आवाज येतो म्हणून तक्रार नोंदवतात. गावकर्‍यांशी मिळून मिसळून राहत नाहीत. त्यांच्या तक्रारीने गावकरी त्रस्त आहेत. त्यांचे घर त्यांच्या आई आणि भावाच्या नावे होते म्हणून कागदपत्र आणा नंतर आम्ही तुमच्या नावे करून देतो, असे ग्रामपंचायतीने म्हटले. बाकी काही नाही. आम्ही त्यांना सहकार्य करायला तयार आहोत. पण त्यांनीही समजून घ्यावे, असे स्पष्टीकरण सरडपारचे उपसरपंच किशोर कोठेवार यांनी तभाकडे दिले.
 
 
पोलिस अधीक्षकांची सरडपारला भेट
बहिष्कार होत असल्याच्या तक्रारीची शहानिशा करण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी गुरूवार, 26 फेब्रुवारी रोजी सरडपार येथे जाऊन आले. त्यांनी गावकर्‍यांची आणि सचिन सोनट्टक्के यांची भेट घेतली व परिस्थिती समजून घेतली.
Powered By Sangraha 9.0