अजिंक्य पोटे आंतरराष्ट्रीय अन्वेषण स्पर्धेत प्रथम

26 Feb 2026 22:02:16
विद्यापीठाच्या गौरवात भर
 
अमरावती, 
Ajinkya Pote अखिल भारतीय विद्यापीठ संघ, नवी दिल्लीच्यावतीने आंतरराष्ट्रीय संशोधन महोत्सव अन्वेषण-२०२६ ही आंतरराष्ट्रीय अन्वेषण स्पर्धा शुलिनी विद्यापीठ, सोलन (हिमाचल प्रदेश) येथे नुकतीच पार पडली. या संशोधन महोत्सवात संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा संशोधक विद्यार्थी अजिंक्य पोटे याने प्रथम क्रमांक प्राप्त करून विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. त्याच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे विद्यापीठाच्या गौरवात भर पडली आहे.
 
 
pote
 
अजिंक्य पोटे याने अ‍ॅग्रिकल्चरल सायन्सेस या विभागात उत्कृष्ट संशोधन सादरीकरण करून प्रथम क्रमांक पटकाविला. त्याच्या प्रकल्पाचे परीक्षक समितीने विशेष कौतुक केले. राजर्षी शाहू कॉलेज ऑफ फार्मसी, बुलडाणा येथील पीएच.डी. संशोधक असलेला अजिंक्य पोटे याने या प्रतिष्ठित स्पर्धेत यश मिळविले आहे.
 
 
कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी केले अभिनंदन
Ajinkya Pote  अजिंक्य पोटे याने आंतरराष्ट्रीय अन्वेषण स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल आणि त्याच्या या यशाबद्दल कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळाचे संचालक डॉ. अजय लाड, आविष्कार सेलच्या समन्वयक डॉ. मनिषा कोडापे यांनी अजिंक्य पोटे याचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात.
Powered By Sangraha 9.0