उपाय सापडला नाही, झाली पोलिसांची कारवाई!
भंडारा : Artificial Intelligence कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआय! त्याने एआय ला "संशयीत आरोपी असल्याने, त्यातून बचाव कसा करायचा " हे विचारले आणि हीच विचारपूस त्याच्या अंगलट आली. गुगल वर ही माहिती शोधल्याने पोलिसांचा संशय बळावला आणि त्याला संशयित आरोपी केले. या भानगडीत पोलिसांच्या मारालाही त्याला समोरी जावे लागल्याची आपबीती सांगत, त्याने न्यायाची अपेक्षा केली आहे. ऐकल्या नंतर जरा विचित्र वाटेल मात्र, वास्तवात घडलेल्या या प्रकारामुळे एका तरुणाला पोलिसांच्या त्रासाचा सामना करावा लागला. गोबरवाही पोलीस ठाणे अंतर्गत एका गावात विजय मला भोरगडे यांच्या घरी 15 फेब्रुवारीला चोरी झाली.
चोरीच्या घटनेत संशयित म्हणून गावचे तंटामुक्तीचे अध्यक्ष प्रमोद भोरगडे व कुणाल भोरगडे यांचे नाव तक्रारकर्त्या महिलेने टाकले. दरम्यान या Artificial Intelligence प्रकरणात आपला दोष नसताना नावाने कुणाल जरा घाबरला. सर्वच समस्यांवर एआय म्हणजे गुगल सर्च हा तोडगा असल्याचा त्याचा समज असावा, म्हणून त्याने एआयला "संशयित आरोपी म्हणून नाव आल्याने त्यातून बचाव कसा करायचा" असा प्रश्न विचारला. एआय ने हात झटकले आणि वकिलांशी संपर्क साधा एवढे सांगितले. परंतु त्यानंतर जे झाले ते कुणाल साठी प्रचंड वेदनादायी होते. संशयित असल्याने पोलिसांनी त्याला चौकशी साठी ताब्यात घेतले. यावेळी त्याचा मोबाईलही जप्त केला गेला. मोबाईल मध्ये ही माहिती शोधल्याचे पोलिसांना समजतात त्यांचा संशय बळावला. सत्य जाणून घेण्यासाठी पोलिसांकडून आपल्याला प्रचंड मारहाण करण्यात आल्याचे स्वतः कुणाल याने आज पत्रकार परिषदेत सांगितले. मारहाणीत आपला हातही फ्रॅक्चर झाल्याचे तो म्हणाला. कुणाल दोषी की निर्दोष पोलिसांच्या तपासाचा भाग असला तरी ज्या एआयला आपण डोक्यावर घेऊन मिरवतो, त्यानेच घात केला असे म्हणता येईल.