थाटात झाला शुभारंभ
अमरावती,
Bal Naṭya spardha महाराष्ट्र शासनाच्या वतीने सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या माध्यमातून मराठी राज्यस्तरीय बाल नाट्यस्पर्धेची अंतिम फेरी अमरावतीत गुरुवार सांयकाळपासून सुरू झाली. या स्पर्धेचे उद्घाटन थाटात झाले. सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार व सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली बालनाट्य स्पर्धेची ही अंतिम फेरी सांस्कृतिक कार्य संचालक विभीषण चवरे यांच्या देखरेखीत आज पासून सुरु झाली. सांस्कृतिक संचालनालयाचे अधीक्षक वसंतराव खडसे स्वतः उपस्थित होते. खासदार डॉ. अनिल बोंडे, माजी खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा, आमदार प्रवीण तायडे, आमदार राजेश वानखडे, आमदार प्रताप अडसड, मनपा विरोधी पक्षनेता विलास इंगोले आदी मान्यवरांनी संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या स्पर्धकांचे स्वागत फलक लाऊन आणि शुभेच्छा देऊन स्वागत केले.
Bal Naṭya spardha स्पर्धा समन्वयक विशाल फाटे, सहसमन्वयक हर्षद ससाणे, नाट्य परिषद मध्यवर्ती मुंबई नियामक मंडळ सदस्य प्रशांत देशपांडे, महापौर श्रीचंद तेजवानी, सभागृह नेता चेतन गावंडे तसेच संपूर्ण महाराष्ट्रभरातून आलेले परीक्षक गोविंद गोडबोले, संजय पाटील, श्याम शिंदे, सुरेश गांगुर्डे आणि जुई बर्वे आदी मान्यवर उद्घाटन प्रसंगी मंचावर उपस्थित होते. शुक्रवार २७ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजल्यापासून कोल्हापूर, परभणी, सांगली, अचलपूर इत्यादी संघाचे ६ बालनाट्य सादर केले जाणार आहेत. ही संपूर्ण स्पर्धा रसिक प्रेक्षकांकरिता निशुल्क ठेवण्यात आलेली आहे. अमरावतीकर कला रसिकांनी या स्पर्धेचा आनंद घ्यावा आणि बाल कलावंतांना प्रोत्साहित करण्याकरिता संपूर्ण स्पर्धेदरम्यान उपस्थित राहावे असे आव्हान नाट्य परिषदेचे स्पर्धा समन्वयक विशाल फाटे, सहसमन्वयक हर्षद ससाणे आणि अमरावती नाट्य परिषदेचे अध्यक्ष अॅड. चंद्रशेखर डोरले यांनी केले आहे.