ऐतिहासिक! भीमाशंकरमध्ये ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’ची तयारी

26 Feb 2026 14:58:30
पुणे,
Bhimashankar temple पुढील वर्षी नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भीमाशंकर मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम वेगाने सुरू आहे. जुन्नर तालुक्यातील या मंदिरातील सभामंडपाचे पुनर्निर्माण सुमारे पावणे तीन हजार चौरस फुटाच्या क्षेत्रफळावर पारंपरिक तंत्रज्ञानाचा वापर करून फक्त चार महिन्यांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
 

Bhimashankar temple renovation, Guinness World Record attempt, 
देशात पहिल्यांदाच अशा स्वरूपाचे जीर्णोद्धाराचे काम पुरातत्त्व विभागामार्फत राबवले जात असून, दगडांच्या साहाय्याने बनविलेले हे बांधकाम गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये समाविष्ट करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. लवकरच यासाठी सल्लागाराची नेमणूक करण्यात येणार असून, लंडन येथील गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या अधिकाऱ्यांशी प्राथमिक चर्चा झाली असून, काम त्यांच्या देखरेखीखाली पूर्ण होणार आहे, असे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले भिमाशंकर ज्योतिर्लिंगाच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला राज्य सरकारने मान्यता दिली असून, यासाठी २८८ कोटी १७ लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे. तर, केवळ सभामंडपासाठी १० कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. ही पुनर्बांधणी सांस्कृतिक, स्थापत्य आणि आध्यात्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे.
 
सभामंडपात एकूण ४८ स्तंभ असून, Bhimashankar temple मध्यभागी घुमट तयार केला जाणार आहे. प्रत्येक स्तंभ दोन ते तीन दगडांमध्ये पूर्ण केला जाईल आणि त्यावर कमानी उभारल्या जातील. या कमानी व घुमट देखील पारंपरिक पद्धतीने, फक्त काही दगडांचा वापर करून उभारले जाणार आहेत. या कामासाठी फक्त चार महिन्यांचा कालावधी ठेवण्यात आला असून, अशा वेगाने पारंपरिक तंत्रज्ञानाचा वापर करून काम पूर्ण करण्याची ही पहिलीच वेळ आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले की, “भीमाशंकर प्रकल्प हा फक्त पुण्यासाठीच नाही, तर राज्य आणि देशाच्या दृष्टीने अभिमानास्पद आहे. जागतिक पातळीवरील वारसा जतन करण्याच्या या उपक्रमाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होईल याची खात्री आहे.”या प्रकल्पामुळे ना फक्त स्थानिक तसेच राष्ट्रीय स्तरावर पारंपरिक कारागिरी व स्थापत्यकला याची ओळख दृढ होईल, तर भविष्यात अशा वारसासंपन्न प्रकल्पांसाठी मार्गदर्शन मिळण्यासही मदत होणार आहे.
Powered By Sangraha 9.0