कारंजा येथील महिलेचा कार अपघातात मृत्यू

26 Feb 2026 17:16:00
भावी नवरदेवासह दोन जण गंभीर
 
कारंजा लाड, 
car accident in Karanja येथील एका ५० वर्षीय महिलेचा कार अपघातात मृत्यू झाला.ही घटना २६ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास धामणगाव रेल्वे गावाजवळील देवगाव जवळ घडली. भावना प्रवीण कदम (वय ५०) असे मृत महिलेचे नाव असून त्या कारंजा येथील दत्त कॉलनी मधील रहिवासी होत्या.
 

bhavana 
 
car accident in Karanja  त्या यवतमाळ येथून धामणगाव रेल्वे कडे जात असताना अचानकपणे एक दुचाकी कारच्या आडवी आली. दुचाकी चालकाला वाचविण्याच्या नादात हा अपघात घडला. या घटनेत भावी नवरदेवासह वरमाय गंभीर जखमी झाले. अपघातानंतर कार चालक घटनास्थळावरून पळ काढण्याच्या प्रयत्नात असताना घटनास्थळावरील नागरिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. भाच्याचे लग्न जुळल्याने ते कुलदेवतेच्या दर्शनासाठी जात होते. त्यांच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात आहे. दरम्यान शुक्रवारी २७ फेब्रुवारी रोजी शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येईल. मृत्यूपश्शात त्यांच्या मागे पती, दोन मुलं आणि आप्त परिवार आहे.
Powered By Sangraha 9.0