शेतात कापूस लागूनच अन् सीसीआईची खरेदी बंद

26 Feb 2026 21:34:25
शेतकरी पुर्ण सुलतानानी संकटात
विलास नवघरे
 
समुद्रपूर, 
यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी नैसर्गिक संकटात सापडला असताना आता २७ फेब्रुवारीपासून CCI cotton purchase सीसीआई कापूस खरेदी बंद होणार असल्याने सुलतानानी संकटात सापडला आहे. तालुयातच नाहीतर वर्धा जिल्ह्यासह राज्यात सीसीआई कापूस खरेदी २७ फेब्रुवारीपासून बंद होणार असल्याने कापूस उत्पादक शेतकर्‍यांची आर्थिक कोंडी होणार आहे. शेतकर्‍यांना आपला कापूस खाजगी व्यापार्‍यांना कवडीमोल भावात विक्री करावा लागणार आहे. २७ फेब्रुवारी अल्टिमेट दिल्याने चार दिवसाच्या आधीपासूनच स्लॉट बुकिंग बंद झालेली आहे म्हणजे आता स्लॉट बुकिंग करता येत नाही आणि असलेला कापूसही सीसीआयला विकता येत नाही.
 
 
kapus
 
CCI cotton purchase  समुद्रपूर तालुयात यावर्षी अतिवृष्टी व उशिरापर्यंत झालेल्या पावसामुळे सुरुवातीला काहीच कापूस निघाला नाही. मात्र, जानेवारी शेवट आणि फेब्रुवारीला मोठ्या प्रमाणात कापूस निघणे सुरू आहे आणि अजूनही शेतकर्‍यांच्या शेतात मोठ्या प्रमाणात कापूस वेचायचा आहे. अशातच चण्याची कापणी सुरुवात झाली त्यामुळे शेतमजुरांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. कापसाचे शेत संपूर्ण पांढरे झाले आहे. समुद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीकडे आधारभूत दराने सीसीआयला कापूस विक्री करण्याच्या दृष्टीने ६ हजार ९७० शेतकर्‍यांकडून नोंदणी करण्यात आली होती. त्यापैकी ४ हजार ३२५ शेतकर्‍यांना सीसीआयने मंजुरी दिली. काही शेतकर्‍यांच्या त्रुटी दुरुस्त करण्यास सांगितले. स्लॉट बुकिंग सुरू करून सीसीआयला कापूस विक्रीचा कल बघता समुद्रपूर तालुयातील सर्व आठही कापूस खरेदी केंद्र सुरू करणे गरजेचे आहे. आधीच अतिवृष्टीमुळे हवालदिल होऊन आर्थिक संकटात सापडलेल्या कापूस उत्पादक शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी सीसीआई कापूस खरेदीची मुदत ३१ मार्चपर्यंत वाढवावी अशी मागणी कृषी उत्पन्न बाजार समिती समुद्रपूर व शेतकर्‍यांनी केली आहे.
 
 
CCI cotton purchase  समुद्रपूर तालुयातील अनेक शेतकर्‍यांचा कापूस अजूनही घरीच आहे. नोंदणी झालेल्या बर्‍याच शेतकर्‍यांचा कापूस २७ फेब्रुवारी शेवटची तारीख असल्यामुळे स्लॉट बुकिंग झाली नाही. आम्ही ३१ मार्चपर्यंत मुदतवाढीकरिता उप महाप्रबंधक भारतीय कपास निगम लिमिटेड अकोला, जिल्हाधिकारी व जिल्हा उपप्रबंधक वर्धा यांना निवेदन दिले अशी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव शंकर धोटे यांनी दिली. आमच्या परिसरातील शेतकर्‍यांच्या घरी सुरुवातीला कापूस न निघाल्यामुळे व आता कापूस निघत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात घरी कापूस साठवलेला आहे. सीसीआय खरेदीची मुदत वाढ झाली नाही तर शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान होणार आहे. शेतकर्‍यांचा विचार करून सीसीआयने मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.
Powered By Sangraha 9.0