चिंचोणी बोटोणी येथे अवैध व्यवसाय विरोधात ग्रामस्थ आक्रमक

26 Feb 2026 20:01:37
पोलिस चौकीसाठी तात्पुरती जागा उपलब्ध
७ मार्चपासून बेमुदत उपोषणाचा इशारा

मारेगाव, 
Chinchoni Botoni: Illegal sale of liquor चिंचोणी बोटोणी येथील अवैध दारू विक्री, मटका व जुगार व्यवसाय तत्काळ बंद करण्यात यावेत, या मागणीसाठी ग्रामपंचायतने प्रशासनाला कडक इशारा दिला आहे. ग्रामपंचायत, चिंचोणी बोटोणी यांच्या वतीने बुधवार, २५ फेब्रुवारी रोजी पोलिस विभागाला निवेदन देण्यात आले.  बोटोनी जिल्हा प्राथमिक शाळेजवळ अवैध दारू विक्री व मटका व्यवसाय सुरू असून त्यामुळे विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे. वारंवार लेखी व तोंडी तक्रारी  करूनही संबंधितांवर ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप ग्रामपंचायतने केला आहे. तसेच गावातील इतर ठिकाणीही अवैध दारू विक्री सुरू असल्याचे निवेदनात नमूद आहे.
 

CHINCHONI
 
 
Chinchoni Botoni: Illegal sale of liquor  कायदा व सुव्यवस्था अबाधित ग्रामपंचायतने जिल्हा परिषद शाळेजवळ पोलिस चौकीसाठी तात्पुरती जागा उपलब्ध करून दिली असल्याची माहिती सरपंच सुनीता विनायक जुमनाके यांनी दिली. अवैध धंद्यांवर तातडीने कारवाई करून ते कायमस्वरूपी बंद करण्यात यावेत, अशी ठाम मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, २८ फेब्रुवारी २०२६ रोजी गावातील महिला भजन मंडळ, महिला बचत गट व ग्रामस्थांच्या प्रतीकात्मक आंदोलन करण्यात येणार आहे. या सोबतच ७ मार्च २०२६ पासून अवैध व्यवसाय बंद करण्याच्या मागणीसाठी महिला व सरपंच यांच्या नेतृत्वात बेमुदत उपोषण करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. प्रशासनाने तातडीने लक्ष घालून कायद्याच्या चौकटीत योग्य ती कारवाई करावी, अन्यथा ग‘ामस्थ लोकशाही मार्गाने आंदोलन तीव‘ करतील, असा इशारा निवेदनातून देण्यात आहे.
Powered By Sangraha 9.0