दत्तापूर येथे अंगणवाडी इमारत बांधकाम सुरू

26 Feb 2026 19:58:28
नियम मात्र धाब्यावर
संबधित अभियंत्याची मूक संमती

कळंब, 
Dattapur Anganwadi विकास कामाची निविदा मंजूर झाल्यावर त्याचे कार्यारंभ आदेश संबधित ठेकेदाराला दिल्या त्यावेळी ठराविक रकमेच्या मुद्रांकावर संबधित ठेकेदाराकडून करार करून घेतला जातो. त्यामध्ये विविध अटी व शर्ती असतात. त्यात विकासकामांच्या ठिकाणी फलक लावणे शासन निर्णयानुसार बंधनकारक आहे. परंतु संबंधित विभागाचे दुर्लक्ष आहे. याबाबत सविस्तर असे की, कळंब तालुक्यातील दत्तापूर येथे अंगणवाडी बांधकाम सुरू असतानासुद्धा या ठिकाणी अजूनपर्यंतही मंजूर झालेला निधी, काम करण्याचा कालावधी, काम करणार्‍या यंत्रणेचे नाव, काम झाल्यानंतर त्या कामातील दोष दुरुस्ती करण्याचा कालावधी, इत्यादी माहिती असलेले फलक लावलेले नाहीत.
 
 
ANGANWADI
 
विकास कामावर फलक लावणे शासन निर्णयानुसार संबधित ठेकेदाराला बंधनकारक आहे. वास्तविक हा फलक लावण्यामागे या सर्व बाबींची माहिती जनतेला व्हावी, असा शासनाचा उद्देश आहे . परंतु दत्तापूर येथे अंगणवाडीचे सुरू असतानासुद्धा अजूनपर्यंत कामाच्या ठिकाणी फलक लावले गेलेले नाहीत. त्यामुळे विकास कामाची माहिती सर्वसामान्य जनतेला होत नसल्याने ठेकेदार आपल्या मर्जीनुसार निकृष्ट काम करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे या बांधकामामध्ये भष्टाचार होत असण्याची दाट शक्यता आहे. बांधकामावर नियंत्रण ठेवणारे अभियंता याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने ठेकेदारासोबत आर्थिक हित जोपसले आहे का, अशी जनतेमध्ये शंका निर्माण होत आहे. संबधित विभागाने याची गांर्भीयाने दखल घेऊन Dattapur Anganwadi अंगणवाडीचे बांधकाम करणार्‍या ठेकेदाराने नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल सबंधित ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणी जनतेतून होत आहे.
Powered By Sangraha 9.0