महाराष्ट्र विधानपरिषदेत सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी!

26 Feb 2026 14:48:37
मुंबई,
Demand for Bharat Ratna for Savarkar स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार देण्याबाबत विधानपरिषदेत पहिल्यांदाच ठरावाची मागणी केली गेली आहे. आज सावरकरांच्या पुण्यतिथीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी विधानपरिषदेत सांगितले की, सावरकर यांना मरणोत्तर भारतरत्न देणे गरजेचे आहे. त्यांनी सांगितले की, हा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवावा आणि तो एकमताने मंजूर करून घेणे योग्य ठरेल. संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या प्रस्तावावर सकारात्मकतेची नोंद घेतली. पाटील म्हणाले की, हा ठराव सभापतींकडे मांडला जाईल, आणि सभागृहातही चर्चेनंतर निर्णय घेता येईल. त्यामुळे महाराष्ट्र विधिमंडळातून आता सावरकरांच्या भारतरत्न पुरस्काराबाबत कारवाई सुरु झाल्याचे दिसते.
 
 
awarkar
 
गेल्या अनेक वर्षांपासून स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्याची मागणी सतत केली जात आहे. केंद्र सरकारने आधीच स्पष्ट केले आहे की भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी शिफारस आवश्यक नाही; योग्य वेळ आल्यावर पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला जाईल. मोदी सरकार सत्तेत आल्यापासून सावरकरांना भारतरत्न मिळावे, अशी मागणी सातत्याने केली जात आहे. यासंदर्भात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनीही मत मांडले असून, सावरकरांना भारतरत्न दिल्यास त्या पुरस्काराचे महत्व वाढेल, असे त्यांनी नमूद केले आहे.
Powered By Sangraha 9.0