नागपूर,
Hindu Conference तुळजाभवानी वस्ती, संताजी परिसर येथे रविवारी भव्य हिंदू संमेलन उत्साहात पार पडले. कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला शनिवारी सुमारे १०० स्त्री-पुरुष व लहान मुलांनी सामूहिकरित्या रामरक्षा स्तोत्र व मारुती स्तोत्र पठण करून वातावरण भक्तिमय केले.दुसऱ्या दिवशी सकाळी संगीत खुर्ची, लिंबू-चमचा, रांगोळी तसेच पुरुषांसाठी वलय (रिंग) स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
संध्याकाळी गोपूजन, ध्वजपूजन व भारत माता पूजन करण्यात आले. त्यानंतर कथक, योगा नृत्य, ‘मिले सुर मेरा तुम्हारा’ या गीतावर नृत्य सादर करण्यात आले. Hindu Conference ‘मी जिजाऊ बोलते’ हा एकपात्री प्रयोग राखी जामकर यांनी प्रभावीपणे सादर केला.प्रमुख वक्ते संजय सराफ यांनी मार्गदर्शन केले. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली. सुमारे ५०० नागरिकांची उपस्थिती लाभली.
सौजन्य : आसावरी कोठीवान, संपर्क मित्र