मूल्यांची जाणीव करून देणे हेच संघाचे ध्येय : वखरे

26 Feb 2026 21:44:35
संत गोमाजी वार्डात विशाल हिंदू संमेलन
 
हिंगणघाट,
Hinganghat : 'Hindu Sammelan'  भारत देशाला आपली मातृभूमी मानतो तो हिंदू, ही संघाची हिंदुत्वाची व्याख्या असून भारतीय संस्कृती व नागरी समाजाच्या मूल्यांची जाणीव समाजाला करून देणे हेच संघाचे ध्येय आहे. नैसर्गिक व मानवी मुल्यांविषयी सजगता निर्माण करण्यासाठी संघ प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन तरुण भारतचे तालुका प्रतिनिधी व प्रसिद्ध वते सतीश वखरे यांनी केले. स्थानिक संत गोमाजी वार्ड येथे २५ रोजी आयोजित हिंदू संमेलनात ते प्रमुख वते म्हणून बोलत होते. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून रमेशबुआ आखरे, मातृशती तालुका संयोजिका अर्चना सातपुते, नप उपाध्यक्ष निलेश ठोंबरे उपस्थित होते.
 
 
Hindu
 
वखरे पुढे म्हणाले, पाश्चिमात्य संस्कृती व येथील कथित पुरोगामी आमचे एकेक वैभव नष्ट करण्याच्या मागे लागलेले असताना आम्ही आमची कुटुंब व्यवस्था टिकवून ठेवण्याचे मोठे आवाहन आज हिंदूंसमोर उभे आहे. हिंदूंचा बुद्धिभेद करून त्यांच्यात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न शहरी नक्षलवादी काही देशद्रोही संघटनांच्या मदतीने करीत आहेत, असा आरोप वखरे यांनी केला. छत्रपती शिवरायांनी मोठ्या कष्टाने निर्माण केलेले हिंदूंचे स्वराज्य टिकवून ठेवण्याची आज खर्‍या अर्थाने गरज आहे. त्यासाठी जिजाऊ माँ साहेबांनी जसा एक शिवछत्रपती घडवीला तशाच पद्धतीने आजच्या आईने आपल्या मुला-मुलींवर संस्कार घडवून ही प्राचीन हिंदू संस्कृती टिकविणे काळाची गरज असल्याचेही ते म्हणाले.
 
 
Hinganghat : 'Hindu Sammelan'  यावेळी अर्चना सातपुते यांनी ‘स्व’ची जाणीव करून आत्मभान जागृत करणे याकरिता भाषा, भूषा, भोजन, भ्रमण, भवन, भजन या सहा ‘भ’ची आठवण सदैव ठेवण्याचे आवाहन केले. रमेशपंत आखरे म्हणाले, संघ एक देशभत संघटना असून संघावर अनेक खोटे व बेछुट आरोप करण्यात आले. परंतु, आपल्या ध्येयापासून ढळला नाही व आज जागतिक स्तरावर संघ पोहोचला. संघाचे कार्य हे समाजोपयोगी असल्याचेही त्यांनी सांगितले. या संमेलनाचे आयोजक आकाश आईटलावार होते. प्रास्ताविक व संचालन पंकज आत्राम यांनी केले. यशस्वीतेसाठी समीर धारकर, मोहन पेरकुंडे, किशोर पेरकुंडे, विनोद राऊत, विकास गाडगे, हिरामण तराळे, दत्तू भोयर, उमेश शास्त्रकार, पराग आजनसरे, प्रमोद सातघरे, अमोल पवार यांनी परिश्रम घेतले.
Powered By Sangraha 9.0