मुरूमगाव पोलिसांच्या कारवाईत सहा गोमातांना जिवदान

26 Feb 2026 17:56:47
धानोरा, 
illegal animal transportation मुरुमगाव पोलिसांना गोमांताची अवैध करून कत्तलीसाठी नेत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसाच्या पथकाने सापळा रचून केलेल्या कारवाईत 6 गोमातांना जिवनदान मिळाले आहे. या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली आहे. 23 फेब्रुवारीच्या पहाटे सुमारे 4 वाजता वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून कारवाई करण्यात आली. कत्तलीसाठी अमानुषपणे पिकअप वाहनात कोंबून नेण्यात येणार्‍या सहा गोमातेची सुटका करण्यात पोलिसांना यश आले. सदर कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना तात्काळ बेड्या ठोकण्यात आल्या. त्यामुळे अवैध्य जनावरांची वाहतूक करणार्‍या व्यक्तीचे धाबे दणाणले आहे.
 
 
janwar
 
illegal animal transportation  अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे जावेद अहमदअली सय्यद (रा. रांगी) व सहआरोपी ऐफाश रिआजली सय्यद (रा. रांगी) अशी आहेत. न्यायालयाने आरोपींना 2 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून पिकअप वाहनासह अंदाजे 5 लाख 23 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदरची कारवाई पोलिस अधीक्षक निलोत्पल तसेच सहाय्यक पोलिस अधीक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी धानोरा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक राहुल चौधरी यांच्या नेतृत्वात हेड कॉन्स्टेबल माहूरकर व कॉन्स्टेबल कोडाप यांनी पार पडली. दरम्यान, वैद्यकीय अधिकार्‍यांकडून जनावरांची योग्य ती आरोग्य तपासणी करून सर्व गायींना पुढील देखरेख व संगोपनासाठी कायदेशीररित्या ध्येय फाउंडेशन गोशाळा गराडा, लाखणी येथे सुपूर्द करण्यात आले आहे.
Powered By Sangraha 9.0