लाल बहादूर शास्त्री शाळेत स्नेहसंमेलन उत्साहात

26 Feb 2026 12:53:25
नागपूर,
Lal Bahadur Shastri School लाल बहादूर शास्त्री हिंदी माध्यमिक शाळा येथे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले.कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून मनपा नागपूरच्या शिक्षणाधिकारी साधना सयाम तसेच महाराष्ट्र शासन राज्य पुरस्कार प्राप्त सेवानिवृत्त शिक्षिका ज्योती कोहळे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा ममता निर्मलकर, सदस्या राधा शर्मा, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका. सीमा जयसिंगानी तसेच प्राथमिक विभागाच्या प्रभारी मुख्याध्यापिका शालिनी माळवी यांचीही प्रमुख उपस्थिती लाभली.

m21 
 
 
दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या स्वागतगीत, पारंपरिक नृत्य व ‘सोशल मीडियाचे दुष्परिणाम’ या विषयावरील नाट्यप्रयोगाने कार्यक्रमाची रंगत वाढवली.Lal Bahadur Shastri School इयत्ता पहिली-दुसरीच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर नृत्य सादर केले.सूत्रसंचालन वनिता काळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन अश्विनी हारोडे यांनी मानले. शिक्षक व कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले.
सौजन्य:माधुरी पाडळकर,संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0