मालेगाव नमाज वाद: सात जणांविरुद्ध गुन्हा

26 Feb 2026 13:10:02
मालेगाव,
Malegaon Namaz controversy मालेगाव महानगरपालिका कार्यालयात कर्मचाऱ्यांनी नमाज अदा केल्याच्या वादामुळे पोलिसांनी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळी गोंधळ उडाल्याच्या तक्रारीनुसार पोलिसांनी तातडीने कारवाई करत प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. महापालिकेच्या विद्युत विभागात काम करणाऱ्या महेंद्र रघुनाथ सावंत यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीत म्हटले आहे की, २३ फेब्रुवारी रोजी दुपारी कार्यालयात लुकमान, सलीमसह चार-पाच जण आले. त्यांनी पथदिव्यांचे खाते आणि रजिस्टर पाहण्याची मागणी केली होती. कार्यालयातील कर्मचारी यांनी योग्य माहिती दिल्यानंतर ते गेले, मात्र सायंकाळी परत येऊन नमाज अदा केली आणि खुर्च्या फेकून कर्मचार्‍यांना जखमी केले.
 
 
 
j78789
सावंत म्हणाले की, आरोपींनी मोबाईलवर व्हिडिओ रेकॉर्ड करताना धमक्या दिल्या आणि सरकारी कामात अडथळा आणला. प्रकरणाची माहिती महापालिका आयुक्तांना दिल्यानंतर पोलिसांनी संबंधित व्यक्तींविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. वैद्यकीय तपासणीची आवश्यकता नाही, असेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. पोलिस आता घटनास्थळी उपस्थित सर्व प्रत्यक्षदर्शींची चौकशी करत आहेत आणि सविस्तर तपास सुरू आहे.
Powered By Sangraha 9.0