जागतिक नेत्यांमध्ये मोदींची डिजिटल आघाडी...इंस्टाग्रामवर १० कोटी अनुयायी पार

26 Feb 2026 09:56:52
नवी दिल्ली,
Modi's digital lead among world leaders पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामाजिक माध्यमांवर नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. चित्रसंचार माध्यम असलेल्या इंस्टाग्रामवर १० कोटी अनुयायी मिळवणारे ते पहिले प्रमुख जागतिक नेते ठरले आहेत. गेल्या दहा वर्षांत त्यांच्या अधिकृत खात्याने जागतिक पातळीवर मोठी लोकप्रियता मिळवली असून, ते सर्वाधिक प्रभावी डिजिटल उपस्थिती असलेल्या नेत्यांपैकी एक बनले आहेत.
 
 
leaders instagram
 
मोदी यांचे अनुयायी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या तुलनेत दुप्पट आहेत. ट्रम्प यांना सुमारे ४३.२ दशलक्ष अनुयायी असून ते या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांना सुमारे १५ दशलक्ष अनुयायी असून ते तिसऱ्या स्थानावर आहेत. ब्राझीलचे अध्यक्ष १४.४ दशलक्ष अनुयायांसह चौथ्या क्रमांकावर, तर तुर्कीचे अध्यक्ष रेचेप तय्यप एर्दोगान ११.६ दशलक्ष अनुयायांसह त्यांच्या मागे आहेत. अर्जेंटिनाचे अध्यक्ष जेवियर मेलेई यांचे सुमारे ६.४ दशलक्ष अनुयायी आहेत.
 
पंतप्रधान मोदी यांच्या १० कोटी अनुयायांची संख्या त्यांच्या जागतिक प्रभावाची आणि विशेषतः तरुणांमधील लोकप्रियतेची साक्ष देणारी मानली जाते. देशांतर्गत राजकारणातही त्यांच्या अनुयायांची संख्या इतर नेत्यांच्या तुलनेत मोठ्या फरकाने आघाडीवर आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना सुमारे १६.१ दशलक्ष अनुयायी असून ते दुसऱ्या स्थानावर आहेत, तर काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना अंदाजे १२.६ दशलक्ष अनुयायी आहेत. डिसेंबर २०२५ पर्यंत निवडक जागतिक नेत्यांमध्ये सर्वाधिक लोकप्रियता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीच असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होते.
Powered By Sangraha 9.0