खा. अमर काळे यांची भारत-युक्रेन संसदीय मैत्री गटावर वर्णी

26 Feb 2026 18:04:58
वर्धा, 
लोकसभा सचिवालयाच्या वतीने १८ व्या लोकसभेच्या कार्यकाळासाठी भारत-युक्रेन संसदीय मैत्री गटाची स्थापना करण्यात आली असून वर्धा लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमर काळे यांचा या मैत्री गटात सदस्य म्हणून समावेश करण्यात आलेला आहे. लोकसभेचे अध्यक्ष यांनी MP Amar Kale खा. अमर काळे यांची या मैत्री गटावर सदस्य म्हणून निवड केली असून भारत आणि युक्रेन या देशांमधील संसदीय, सांस्कृतिक व द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यासाठी हा मैत्री गट कार्य करणार आहे.
 
 
amar
 
वर्धा लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे विदर्भातील खासदार अमर काळे यांची नियुती या मैत्री गटात झाल्याने ही बाब वर्धा लोकसभा मतदार संघातीलच नव्हे तर विदर्भातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या दृष्टीनेही अभिमानाची आहे. या संसदीय मैत्री गटाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी खा. अमर काळे यांना मिळाली आहे. MP Amar Kale  खा. अमर काळे हे एक उत्कृष्ट संसदपटू म्हणून आपल्या खासदारकीच्या अल्पशा कालावधीतच त्यांनी आपल्या खासदारकीची संसदेतच नाही तर आपल्या लोकसभा मतदार संघात छाप पाडली. त्यांचे मतदार संघातील लोकांच्या समस्या ज्या पोटतिडकीने ते संसदेत मांडतात व त्या समस्यांची संपूर्ण उकल करून त्या सोडविण्यापर्यंत जो त्यांचा पाठपुरावा असतो तो अतुलनिय आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊनच खा. अमर काळे हे या समितीवर आपल्या निवडीला व पदाला योग्य न्याय देतील हे गृहीत धरूनच त्यांची या समितीवर निवड झाली असावी. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Powered By Sangraha 9.0