पुणे
Pune Yerwada Jail, येरवडा कारागृहात केलेल्या तपासणी मोहिमेत कैद्यांकडून मोबाइल संच, पॉवर बँक आणि चार्जिंग वायर सापडल्याची घटना समोर आली आहे. याबाबत सहायक तुरुंगाधिकारी सुनील गायकवाड यांनी कैदी नौशाद बद्रुद्दीन शेख यासह इतर काही कैद्यांविरोधात येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, Pune Yerwada Jail, २१ फेब्रुवारी रोजी सायंकाळी येरवडा कारागृहात गायकवाड हे नियमित गस्त (संचारफेरी) करत होते. त्या वेळी कारागृहातील भिंतीजवळ असलेल्या स्वच्छतागृहाजवळ एक कैदी थांबला होता. त्याच्या संशयास्पद हालचालींवरून त्याच्याकडे विचारणा केली असता, त्याने जमिनीवर मोबाइल पडल्याचे सांगितले. त्यानंतर तो कारागृहाच्या बराकीत गेला.तपासणी मोहिमेची पुढील टप्पा २२ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेचार ते सायंकाळी साडेसहादरम्यान राबवण्यात आला. या वेळी बराक क्रमांक एकमधील कैदी नौशाद शेख याची झडती घेण्यात आली. तपासात एका पिशवीत एक मोबाइल, बॅटरी, सिम कार्ड आणि चार्जिंग वायर सापडली. यानंतर बराक क्रमांक एक, दोन आणि तीन यांची झडती घेतल्यावर एकूण चार मोबाइल, बॅटरी आणि दोन पॉवर बँक सापडल्या.कारागृहात मोबाइल वापरावर बंदी असून आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यासंबंधी तपास उपनिरीक्षक कुंदन सत्रे हे करत आहेत.ही घटना येरवडा कारागृहातील सुरक्षा आणि नियम पालनाविषयी प्रश्न निर्माण करत असून, प्रशासनाची अधिक कठोर तक्रार आणि तपास मोहिमा अपेक्षित आहे.