पंप लावण्यात मोठा विलंब
बोरी चंद्रशेखर,
शेतीचे उत्पन्न वाढावे व त्यासाठी वीज मिळावी यासाठी पंतप्रधान कुसुम आणि मागेल त्याला Solar Pump Scheme सोलर पंप योजना सुरू केली आहे. नवीन कृषी विद्युत जोडणी देणे बंद करून सोलर पंप लावण्याचे आदेश आले. योजना चांगली असूनदेखील त्यांची अंमलबजावणी करणारी प्रशासन यंत्रणा कुचकामी ठरत आहे. कृषी पंपाची आवश्यकता रब्बी हंगाममध्ये असतेच. परंतु पंप लावून न मिळाल्यामुळे रब्बी हंगाम धोक्यात आला आहे. शेतकर्यांचे ५० टक्यांपेक्षा जास्त उत्पन्न घटले आहे. शेतकर्यांचा दावा आहे की, यामुळे हरभरा आणि गव्हाच्या उत्पादनात ५० टक्क्यांहून अधिक घट झाली.
कंपन्यांची गती
काही कंपन्या शेतकर्यांची पूर्वपरवानगी न घेता थेट ‘व्हेंडर सिलेक्शन’ करत असल्याचाही आरोप होत आहे. यामुळे अपेक्षित कंपनी न मिळाल्यास शेतकरी संतप्त होऊन तक्रारी करत आहेत. तरीही प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याची नाराजी आहे.
अर्धवट साहित्य : शेतकरी त्रस्त
Solar Pump Scheme अनेक शेतकर्यांना पूर्ण संच मिळालेला नाही. यवतमाळ जिल्हा सुपीक जमिनीमुळे जातो. २०२५ मध्ये पाऊसमान समाधानकारक राहिल्याने रब्बी हंगामात हरभरा आणि गहू मोठ्या प्रमाणावर पेरण्यात आले. मात्र, वेळेवर सिंचनासाठी शाश्वत विजेची गरज असताना सौरपंप बसविण्यात झालेल्या विलंबामुळे अनेकांना पाणी असूनही पिकांना योग्य वेळी पाणी देता आले नाही. सध्या राज्य सरकारचे अर्थसंकल्प अधिवेशन सुरू आहे. या संदर्भात प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी दखल आणि शेतकर्यांना न्याय मिळवून द्याावा अशी अपेक्षा आहे.
शेतकर्यांची मागण्या
प्रलंबित अर्जाची तातडीने पूर्तता, कंपन्यांच्या मनमानीवर अंकुश, अर्धवट साहित्य पुरवठ्यावर कारवाई, वेळेत सिंचनासाठी स्पष्ट वेळापत्रक जाहीर करणे या शेतकयांच्या मागण्या आहेत. सौर कृषी पंप योजना ही शेतकर्यांसाठी शाश्वत सिंचनाचा महत्त्वाचा पर्याय मानली जाते. मात्र, अंमलबजावणीतल्या त्रुटींमुळे हजारो शेतकरी अडचणीत आहेत. शासनाने तातडीने उर्वरित पंप बसविण्याची प्रकि‘या गतीमान करावी, अशी मागणी आहे. या सार्या प्रकि‘येकडे प्रशासनाचा कानाडोळा होत असून योजनेची अंमलबजावणी करणार्या पंधराहून अधिक कंपन्या जिल्ह्यात कार्यरत आहेत. मात्र त्यांची पंप बसविण्याची गती अत्यंत संथ असल्याची तक‘ार आहे.