वाशीम,
शेग्रीगेशन शेड अर्थात कचरा विलगीकरण केंद्र, सार्वजनिक शौचालय, घंटागाडी सार्वजनिक, कचरा कुंड्या इत्यादी सुविधा ग्राम पंचायत स्तरावर उपलब्ध असून, त्याच्या शाश्वततेसाठी गावातील महिलांनी पुढाकार घ्यावा असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकार अर्पित चौहाण यांनी स्थानिक गुलाटी हॉटेल मध्ये आयोजित कार्यशाळेत केले.
'Swachh Bharat Mission' -2 स्वच्छ भारत मिशन टप्पा-२ अंतर्गत कचर्याचे विलगीकरण सार्वजनिक स्वच्छता आणि वर्तणूक बदल घडविणे बाबत दोन दिवशी प्रशिक्षणाच्या समारोप कार्यक्रमात सीईओ चौहान यांनी महिलांशी संवाद साधला. यावेळी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी धैर्यशील पाटील, एएफसी इंडिया लिमिटेड संस्थेचे राज्य समन्वयक केशव घीगे, क्षमता बांधणे तज्ञ प्रफुल्ल काळे, मनुष्यबळ विकास सल्लागार शंकर आंबेकर आणि जनसंपर्क अधिकारी राम श्रृंगारे यांची उपस्थिती होती. सीईओ चौहाण म्हणाले बचत गटातील महिलांनी पारंपारिक व्यवसायाच्या चाकोरीतून बाहेर येऊ नाविन्यपूर्ण व्यवसायात उतरावे. शासनाच्या वतीने तालुयातील एका गावामध्ये प्लास्टिक व्यवस्थापन प्रकल्प उभारण्यात आला सक्षम बचत गटांनी हा प्रकल्प चालवण्यासाठी पुढाकार घ्यावा. जिल्हा परिषद अशा बचत गटांना प्राधान्य देईल अशी आश्वासन दिले.
स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा २ अंतर्गत एएफसी इंडिया लिमिटेड नवी दिल्ली या संस्थेच्या वतीने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणासाठी प्रशिक्षक म्हणुन विलास भालेराव, प्रविण पट्टेबहादुर आणि प्रभु कांबळे हे प्रशिणार्थींना मार्गदर्शन करीत आहेत. कार्यशाळेत वाशीम तालुयातील महिलांनी सहभाग घेतला होता. समारोपीय कार्यक्रमात मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहाण यांच्या हस्ते प्रशिक्षणार्थी महिलांना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.
'Swachh Bharat Mission' -2 पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, राज्य पाणी व स्वच्छता मिशन कक्ष आणि जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष यांच्या समन्वयातून एएफसी इंडिया लिमिटेड नवी दिल्ली या संस्थेच्या वतीने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. प्रत्येक ग्राम पंचायतीतधुन ३ महिला प्रतिनिधींना या कार्यशाळेला आमंत्रित करण्यात आले आहे. वाशीम जिल्ह्यातील ४९१ ग्राम पंचायती मधील एकूण १४७३ महिलांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. २१ फेब्रुवारी पासून सुरू झालेले हे प्रशिक्षण १७ मार्च पर्यंत चालणार असल्याची माहिती क्षमता बांधणी सल्लागार प्रफुल्ल काळे यांनी दिली.