स्वातंत्र्यवीर सावरकर अभिवादन सोहळा
बुलढाणा,
'Swatantrya Veer Savarkar' स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे प्रखर राष्ट्रभक्त होते त्यांनी आपले संपूर्ण जिवन भारतमातेच्या चरणी समर्पित केले होते. त्यांच्या प्रेरणादायी विचारांचा वसा घेत १९८५ साली चैतन्यवाडीतील काही तरूणांनी या चौकाचे नामकरण स्वातंत्र्यवीर सावरकर चौक असे केले. या माध्यमातून विविध कार्यक्रमांचे आयोजन येथे करण्यात येते. या चौकाचे नपा प्रशासनाच्या वतीने सौदर्यींकरण करण्यात यावे अशी मागणी भारतीय मजदूर संघाचे विदर्भ प्रांत अध्यक्ष रविंद्र गणेशे यांनी केले.
Swatantrya Veer Savarkar' स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पूण्यतिथी निमित्त दि. २६ फेब्रुवारी रोजी स्थानिक वीर सावरकर चौकात अभिवादन सोहळा चैतन्यवाडी मंडळाच्या वतीने संपन्न झाला. याप्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेला माल्यापर्ण करून अभिवादन करण्यात आले. संस्कृत भारतीचे जिल्हा सयोजक प्रा. विजय जोशी, जेष्ठ विधिज्ञ प्रदिप कविमंडन यांनी सुद्धा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जिवनावरील विविध प्रसगांवर प्रकाश टाकला. स्वातंत्र्यवीर सावरकरांशी जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात यावी अशीही मागणी अॅड. कविमंडन यांनी केली. या कार्यक्रमाला स्वातंत्र्यवीर सावरकर प्रेमी गजनान कुळकर्णी, उल्हास पाठक, वसंतराव ढोले, अमित कुळकर्णी, अजिंक्य कुळकर्णी, मेघना पेठे, संजय पेठे, सुहास ठोके, संजय कोलवाडकर, कुमार कोलवाडकर, विवेकानंद गदरे, उत्कृर्ष डाफणे, किरण देशपांडे, विजय वाघ यावेळी उपस्थित होते.