‘विरोश’च्या लग्नाची सर्वत्र चर्चा... तयारी सुरु

26 Feb 2026 11:09:43
उदयपूर,
Virosh wedding राजस्थानातील निसर्गरम्य आणि शाही वातावरणासाठी ओळखल्या जाणाऱ्या उदयपूर Udaipur शहरात दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार Vijay Deverakonda आणि लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदान्ना यांच्या विवाहसोहळ्याची धूम सुरू झाली आहे. सोशल मीडियावर ‘विरोश’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या या जोडीने लग्नाच्या पूर्वसोहळ्यांची पहिली झलक चाहत्यांसोबत शेअर करताच चाहत्यांमध्ये आनंदाची लाट उसळली आहे. आज, २६ फेब्रुवारी २०२६ रोजी मुख्य विवाहसोहळा पार पडणार असून त्याआधीचे सर्व कार्यक्रम उत्साह, ऐश्वर्य आणि जवळच्या नातलगांच्या उपस्थितीत रंगले आहेत.
 

Vijay Deverakonda, Rashmika Mandanna, Virosh wedding 
लग्नाच्या प्रारंभीच्या Virosh wedding  कार्यक्रमांमध्ये पारंपरिक औपचारिकतेपेक्षा रिलॅक्स आणि पार्टीसदृश वातावरण पाहायला मिळाले. विजय देवरकोंडाने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीजवर शेअर केलेल्या छायाचित्रांमध्ये सूर्यप्रकाशात न्हालेल्या पूलकिनारी पाहुण्यांचा जल्लोष दिसून आला. पूल व्हॉलीबॉलसारख्या खेळांमुळे वातावरणात अधिक रंगत आली होती. हिरव्यागार परिसरात हसरे चेहरे, हातात लाल रंगाचे कप आणि अनौपचारिक पोशाख यामुळे दूल्ह्याच्या बाजूने जल्लोषपूर्ण सुरुवात झाल्याचे स्पष्ट झाले.दुसरीकडे, रश्मिका मंदानाने समारंभाचा अधिक सुसंस्कृत आणि एलिगंट पैलू चाहत्यांसमोर आणला. तिच्या शेअर केलेल्या छायाचित्रांमध्ये सोनसळी प्रकाशात उजळलेले भव्य डिनर सेटअप पाहायला मिळाले. टेबल सजावटीसाठी ब्लश लिली, हायड्रेंजिया आणि ताज्या फळांचा वापर करण्यात आला होता. विशेष म्हणजे, पाहुण्यांसाठी खास जपानी डाइनिंग अनुभवाची व्यवस्था करण्यात आली होती. बारकाईने आखलेल्या मेन्यूमुळे या सेलिब्रेशनला आंतरराष्ट्रीय स्पर्श लाभला.
 
 
या संपूर्ण विवाहसोहळ्याचे Virosh wedding  आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ‘VIROSH’ या नावाचा अधिकृत वापर. नैपकिनवर काढलेली ही नक्षी चाहत्यांनी दिलेल्या टोपणनावाला दिलेला सन्मान मानला जात आहे. विवाहाची अधिकृत घोषणा करताना या दोघांनी ‘तुम्ही आम्हाला प्रेमाने दिलेले नावच आम्ही आमच्या लग्नाला देत आहोत,’ असे भावनिक शब्दांत सांगितले होते.हा भव्य सोहळा उदयपूरमधील आलिशान ITC Mementos – Ekaaya Udaipur येथे आयोजित करण्यात आला आहे. सुंदर लँडस्केप आणि शाही सोयीसुविधांसाठी प्रसिद्ध असलेल्या या ठिकाणी सध्या लग्नाचा जल्लोष सुरू आहे. आता काही तासांतच विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना सात फेरे घेऊन वैवाहिक जीवनाची नवी सुरुवात करतील, आणि चाहत्यांच्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम मिळेल.
Powered By Sangraha 9.0