नागपूर,
Virangula Senior Women's Club विरंगुळा ज्येष्ठ महिला मंडळाच्या तेजस्विनी साहित्य पुष्पमालेचे २६वे पुष्प नुकतेच उत्साहात संपन्न झाले. चार दिवस चाललेल्या या कार्यक्रमात विविध विषयांवर मार्गदर्शन व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
पहिल्या दिवशी मनीषा संत यांनी “ज्येष्ठत्वाची जबाबदारी” या विषयावर विचार मांडले. दुसऱ्या दिवशी प्रफुल्ल माटेगावकर यांनी वासुदेव बळवंत फडके यांच्या कार्याचे स्मरण करून प्रेरणादायी माहिती दिली. तिसऱ्या दिवशी डॉ. शरद निंबाळकर यांनी “मन करा रे प्रसन्न” या विषयावर ज्येष्ठ महिलांना सकारात्मक जीवनदृष्टीचे मार्गदर्शन केले.चौथ्या दिवशी पी. सावळाराम यांच्या गाण्यांवर आधारित गायन स्पर्धा पार पडली.Virangula Senior Women's Club या स्पर्धेत २६ स्पर्धकांनी उत्साहाने सहभाग घेत विविध गीते सादर केली. गौरी पटवर्धन यांनी प्रथम क्रमांक, पल्लवी खरे यांनी द्वितीय क्रमांक, तर मीरा जोगळेकर व सुप्रिया देव यांनी तृतीय क्रमांक विभागून मिळवला.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विजया विघ्ने, अनघा फडके व कार्यकारिणीतील सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.
सौजन्य:संजीव डोके,संपर्क मित्र