वारजूकर बंधुंनी घेतला भाजपात प्रवेश

26 Feb 2026 19:28:39
प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले स्वागत

चंद्रपूर, 
Warjukar brothers join BJP आमदार बंटी भांगडिया यांच्या विकासाभिमुख धोरणांवर विश्वास व्यक्त करीत त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाचे माजी आमदार डॉ. अविनाश वारजूकर, चंद्रपूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे महासचिव डॉ. सतीश वारजूकर, युथ काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश महासचिव व शंकरपूरचे सरपंच साहिष सतीश वारजूकर तसेच पलाश अविनाश वारजूरकर यांनी अधिकृतपणे भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
 

bjp dsl 
 
Warjukar brothers join BJP  प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते हा पक्षप्रवेश सोहळा मुंबईतील पक्ष कार्यालयात पार पडला. यावेळी त्यांनी वारजूकर कुटुंबियांचे भाजपात मनःपूर्वक स्वागत केले आणि त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. भाजपा परिवारात नव्या जोमाने सामील झालेल्या या नेतृत्वामुळे संघटनात्मक बळ वाढेल होईल, असा विश्वासही व्यक्त केला गेला. यावेळी जिल्हा मध्यवर्ती सहाकरी बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, जिल्हा बँक संचालक आवेश खान पठाण, संचालक गणेश तर्वेकर, विलास ईखार, सचिन आकुलवार उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0