यवतमाळ नपचा शाश्वत विकास व नागरिक केंद्रित ‘अर्थसंकल्प’

26 Feb 2026 19:54:11
कोणतीही करवाढ नाही : ३१७.३७ कोटींचा आयव्यय

यवतमाळ, 
शाश्वत विकास आणि नागरिक केंद्रित यावर भर देणारा २०२६-२७ चा Yavatmal Municipal Council: ‘Budget Resolution’ यवतमाळ नगर परिषदेचा ३१७.३७ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प नगर परिषद अध्यक्ष अ‍ॅड. प्रियदर्शनी उईके यांनी गुरुवार, २६ फेब्रुवारी रोजी सादर केला आहे. या सभेला नप उपाध्यक्ष दत्ता कुळकर्णी यांच्यासह सर्वच नगरसेवक उपस्थित होते. सभेच्या पहिल्या सत्रात नगर परिषद अध्यक्ष अ‍ॅड. उईके यांनी शहराच्या सर्वांगीण प्रगतीचा भविष्यातील समृद्धीचा आराखडा असलेला अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात कुठल्याही प्रकारची करवाढ करण्यात आलेली नाही. यवतमाळ नगर परिषद हद्दतील मालमत्ता हस्तांतरणावर आकारण्यात येणारे १ टक्का शुल्क रद्द केल्यामुळे नगर परिषद उत्पन्नात जी तूट निर्माण होणार आहे, ती भरून काढणे व उत्पन्न वाढविणे यासाठी विशेष भर देण्यात येणार आहे.
 
 
pri
 
शंभर कृती आराखडा अंतर्गत नमूद कामे अंमलबजावणीकरिता तरतुदी करण्यात आल्या आहेत. पायाभूत सुविधा अंतर्गत शहरातील रस्त्यांचे जाळे अधिक भक्कम करण्यावर या अर्थसंकल्पात भर देण्यात आली आहे. तसेच खड्डेमुक्त रस्ते बनविण्यात जास्तीत जास्त तरतूद केली आहे. स्वच्छता आणि आरोग्य यावर स्वच्छ सर्वेक्षण २०२६ अंतर्गत शहराला कचरामुक्त करण्यासाठी आधुनिक यंत्रणा आणि घंटागाड्यांच्या वाढ करण्याची तरतूद करण्यात आली आहे. तसेच आरोग्य विभागामार्फत सर्वसामान्य नागरिकांना उत्तम सोयी मिळण्यासाठी नागरी आरोग्य केंद्राचे सक्षमीकरण करण्यात येणार आहे. त्याचबरोबर पाणीपुरवठा वाढत्या लोकसं‘येचा विचार करता शहराच्या प्रत्येक भागात सुरळीत आणि पुरेसा पाणीपुरवठा जीवन प्राधिकरण यांच्या समन्वयाने अमृत योजनेच्या कामांना गती देण्यात येणार आहे. तसेच विहीर साफसफाई, हातपंप भर देण्यात येईल.
 
 
 
Yavatmal Municipal Council: ‘Budget Resolution’ पर्यावरण आणि सौंदर्यीकरण अंतर्गत यवतमाळ शहरात नवीन उद्याने विकसित करणे, जुन्या उद्यानांचे नूतनीकरण आणि मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात येणार आहे. डिजिटल सेवा करभरणा आणि इतर नागरी सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देऊन पारदर्शकता वाढवण्यात येणार आहे. दिव्यांग कल्याणकरिता आर्थिक दुर्बल घटकांसह महिला व बालकल्याण करिता योग्य योजना येणार आहेत. नगर परिषदेचे २०२५-२६ चे सुधारित आणि २०२६-२७ चे अनुमानित अंदाजपत्रक एकूण सुरवातीच्या शिल्लकेसह जमा ३१७,३७,७४,१५६ (तीनशे सतरा कोटी सदतीस लाख चौर्‍याहत्तर हजार एकशे छप्पन) रुपयांचे आहे. यात महसुली जमा रक्कम १०३,७७,००,०७२ (एकशे तीन कोटी सत्याहत्तर लक्ष बहात्तर) रुपये आहे.
 
 
भांडवली जमा रक्कम १२१ कोटी ४२ लक्ष रुपये आणि ऋण व निलंबन लेखे धरून असून खर्चाकरिता तरतूद रुपये ३१४ कोटी ०५ लक्ष ७० हजार रुपये आहे. यात महुसली खर्च रक्कम १०३ कोटी ५२ लक्ष ७० हजार हजार रुपये आणि भांडवली खर्च १३६ कोटी ५५ लक्ष रुपये आणि असाधारण ऋण व निलंबन लेखा धरून करण्यात असून खर्च वजा अखेर शिल्लक रुपये ३ कोटी ३२ लक्ष ०४ हजार १५६ रुपयांचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले आहे.
Powered By Sangraha 9.0