कॉफी, व्हॅनिला, चॉकलेटच्या चव व सुगंधाचा रंग उधळा

27 Feb 2026 20:23:49
नैसर्गिक रंगांना मागणी
हजारोंच्या घरात गेल्या पिचकार्‍या
 
वर्धा, 
धुळवळीचा सण आता तीन दिवसांवर आला असल्याने Holi colors in market बाजारपेठेत रंगांची उधळण सुरू झाली. शहरातील विविध दुकानांत रंग, गुलाल आणि आकर्षक पिचकार्‍यांची रेलचेल दिसून येत असून लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच रंगोत्सवाच्या खरेदीच्या तयारीत लागले आहेत. यावेळी विशेष आकर्षण ठरत आहेत नैसर्गिक आणि त्वचेसाठी सुरक्षित असलेले रंग. फुलांपासून, हर्बल घटकांपासून तसेच चॉकलेट, कॉफी, व्हॅनिला चवेचा, तसाच सुगंधी उपलब्ध असलेला गुलाल ग्राहकांना भुरळ घालत आहे. अनेक दुकानांत दोन पॅकच्या ऑफरपासून वेगवेगळ्या किमतींचे गुलाल उपलब्ध आहेत. सेंद्रिय आणि सुगंधी गुलालाला विशेष मागणी वाढल्याचे येथील प्रत्येक सण उत्सावात नावीन्य असलेल्या वस्तू विक्रीसाठी आणणारे कलशचे राजकुमार जाजू यांनी सांगितले.
 

holi 
 
Holi colors in market  बाजारात विविध प्रकारच्या आणि आकारच्या पिचकार्‍या, छोट्या मुलांसाठी कार्टूनच्या आकारातील पिचकार्‍या, मोठ्या टँकरसारख्या वॉटर गन, बॅटरीवर चालणार्‍या इलेट्रिक गन तसेच लांब पाईपद्वारे दूरवर पाणी फेकणार्‍या आधुनिक पिचकार्‍यांनी मुलांचे लक्ष वेधले आहे. गुलालाचे विविध रंग आणि त्याचे फटाकेही बाजारात आहेत. काही पिचकार्‍यांच्या किंमती १०० रुपयांपासून थेट हजारो रुपयांपर्यंत असल्याने ग्राहकांकडून उत्सुकता दिसत आहे. याशिवाय रंगीत फुगे, एलईडी वॉटर गन, डिझायनर चष्मे, टोपी, टी-शर्ट, मास्क आणि होळी पार्टीसाठी सजावटीच्या वस्तूंचीही विक्री जोरात सुरू आहे. रंगीत बर्फ, फेस स्प्रे आणि खास थीम अ‍ॅसेसरीजमुळे तरुणाईमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. वेगवेगळी आणि भयानक मुखवटे, केसश्रृंगार, गॉगल्स, रासायनिक रंगांऐवजी सुरक्षित आणि पर्यावरणपूरक रंग वापरण्याकडे लोकांचा कल वाढत असल्याचे जाजू यांनी सांगितले. आरोग्य जपत आनंदाने सण साजरा करण्यावर भर दिला जात आहे. रंगोत्सवाची खरी धामधूम आता सुरू झाले आहे. सेलू तालुयात सुरगाव येथे रंगविना होळी खेळल्या जाते. त्या ठिकाणी सर्व गाव एकत्र येत धुळवळीला ग्राम स्वच्छता, रामधून, समाज सेवकांचा सत्कार आदी कार्यक्रम होतात तर ग्राम गीतेत म्हटल्या प्रमाणे होळी हा सण सर्वांनी ग्राम शुद्धी दिन म्हणून साजरा करण्याचे आवाहन करीत वर्धेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मंडळाच्या वतीने प्रभात फेरी काढून जनजागृती केली जाते.
Powered By Sangraha 9.0